काशी कापडी समाजाच्या मेळाव्यात पाच शुभमंगल

By Admin | Updated: May 24, 2017 11:14 IST2017-05-24T11:14:11+5:302017-05-24T11:14:11+5:30

सामूहिक विवाह : देशभरातील समाजबांधवांची सोहळ्यास उपस्थिती

Five Shubhamangal celebrations of Kashi Kapadi Samaj | काशी कापडी समाजाच्या मेळाव्यात पाच शुभमंगल

काशी कापडी समाजाच्या मेळाव्यात पाच शुभमंगल

>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.24 - काशी कापडी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा शहरातील ओक मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. यात दहा उपवरांचे  शुभमंगल झाले. 
जिल्हा काशी कापडी समाजातर्फे शहरातील ओक मंगल कार्यालयात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुरेश भोळे, नगरसेविका भारती सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रांत उपाध्यक्ष सतीश लोंकलकर, उपाध्यक्ष विजय गंगारे, विनोद गंगारे, राजाराम लोंकरकर, नंदकिशोर लोंकलकर, प्रदीप लोंकलकर, मनोज गंगारे आदी पदाधिका:यांची उपस्थिती होती. 
देशभरातून उपस्थिती
सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे 1800 समाजबांधव या सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित होते. गेल्या 15 वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे. यापुढे अधिक मोठय़ा प्रमाणावर सोहळा आयोजित करण्याचा निर्धार आयोजकांनी केला. 

Web Title: Five Shubhamangal celebrations of Kashi Kapadi Samaj