तरुणांच्या मृत्युप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:21 IST2021-08-22T04:21:12+5:302021-08-22T04:21:12+5:30
फिर्यादी सुधाकर राजधर झाल्टे (हातले) यांनी न्यायालयात दाद मागताना म्हटले आहे की, त्यांचे संशयित आरोपीतांशी पूर्ववैमनस्यातून वाद सुरू होते. ...

तरुणांच्या मृत्युप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
फिर्यादी सुधाकर राजधर झाल्टे (हातले) यांनी न्यायालयात दाद मागताना म्हटले आहे की, त्यांचे संशयित आरोपीतांशी पूर्ववैमनस्यातून वाद सुरू होते. या वादाचा बदला घेण्यासाठी ही घटना घडली. फिर्यादी सुधाकर यांचा मुलगा सागर (२०) याला गोड बोलून ३ मे २०२० रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान हातले गावाजवळील धरणावर पोहायला घेऊन जाऊन तेथे सागरचा गळा दाबून त्यास पाण्यात बुडवून त्याचा निर्दयपणे खून केला होता.
याबाबत पोलिसात घटनेची माहिती देऊनही दखल घेतली नाही म्हणून त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार संशयित चेतन साहेबराव झाल्टे, सागर तात्या झाल्टे, दादा शिवराम बाविस्कर, मुकेश सीताराम झाल्टे व भूषण लक्ष्मण झाल्टे (सर्व हातले) यांचेविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३४ नुसार ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.