पिंपळनेरला एकाच रात्री पाच घरफोडय़ा

By Admin | Updated: November 21, 2015 00:42 IST2015-11-21T00:42:03+5:302015-11-21T00:42:03+5:30

पिंपळनेर : शहरातील मोरयानगर व मोरया सोसायटी येथे एकाच रात्री पाच घरफोडीच्या घटना घडल्या.

Five people were killed in Pimpalaina the same night | पिंपळनेरला एकाच रात्री पाच घरफोडय़ा

पिंपळनेरला एकाच रात्री पाच घरफोडय़ा

पिंपळनेर : शहरातील मोरयानगर व मोरया सोसायटी येथे एकाच रात्री पाच घरफोडीच्या घटना घडल्या. सर्व घटनांत मिळून लाखो रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सटाणा रोडलगत असलेल्या नवीन वसाहतीत गुरुवारी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास मोरयानगर व थोडय़ाच अंतरावर मोरया सोसायटीत एकामागून एक अशा पाच घरफोडय़ा झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यात मोरयानगरमधील प्रशांत ङिापरू तायडे हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असल्याने चोरटय़ांनी संधीचा फायदा घेत घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात काही न मिळाल्याने घराच्या वरच्या मजल्यावर मोर्चा वळवत लाकडी कपाट तोडून त्यातील वस्तू अस्ताव्यस्त केल्याचे आढळून आले. सदर घरमालकांशी फोनवरून संपर्क साधला असता घरात सोन्याची कोणतीही वस्तू नव्हती. रोख रक्कम दोन हजार रुपये चोरीस गेल्याचे समजते. यापुढे मोरया सोसायटीची वस्ती असून येथे उज्ज्वला टेकम या आश्रमशाळेच्या शिक्षिकेचे घर असून त्या नागपूर येथे गेल्याने घराला कुलूप पाहून चोरटय़ांनी येथे चोरी करण्याचा प्रय} केला. टेकम यांना फोनवरून माहिती दिल्याने घरातील कपाटातील चांदीच्या काही वस्तू व अंदाजे पाच हजार रुपये चोरीस गेल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

काही अंतरावर विजय पोपट सावळे हे फौजी असून त्यांच्या घराला कुलूप पाहून घराचा कडीकोंडा तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून चोरी करण्यात आली. घटनेची माहिती कळताच ताहाराबाद येथून त्यांच्या आई आल्या व पाहणी केली असता 10 ते 15 पितळी भांडे, सोन्याची चेन, 35 हजार रुपये किमतीचा एलसीडी चोरीस गेल्याचे सांगण्यात आले.

या घरासमोरच भास्कर पांडुरंग भदाणे या शिक्षकाचे घर असून घरातून रोख पाच हजार रुपये चोरांनी कपाटातून नेल्याचे भदाणे यांनी सांगितले. तेही बाहेरगावी गेले होते. पुढील भोसले यांच्या घराचे कुलूप मास्टर चावीने उघडले. कपाट तोडून घरातील पाहणी केल्याचे आढळले. मात्र घरातून काही चोरीस गेले नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Five people were killed in Pimpalaina the same night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.