शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:17 IST

पळासखेडा (गुजराचे), ता.जामनेर येथील अनिल कडू खंडारे या तरुणाच्या खून प्रकरणात आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे (सर्व रा.पळासखेडा गुजराचे ता.जामनेर) या पाच जणांना न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.

ठळक मुद्देजळगाव न्यायालयाचा निकाल मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन केला होता खूनजखमी अवस्थेत फेकले विहिरीत

जळगाव : पळासखेडा (गुजराचे), ता.जामनेर येथील अनिल कडू खंडारे या तरुणाच्या खून प्रकरणात आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे (सर्व रा.पळासखेडा गुजराचे ता.जामनेर) या पाच जणांना न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.याबाबत अधिक माहिती अशी की, ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सायंकाळी सात वाजता आनंदा उर्फ अण्णा समाधान जारे, किशोर पंढरी सुरवाडे, सागर वसंत साबळे, गौतम भिमराव जारे व सुनील मधुकर लोखंडे या पाच जणांनी गल्लीतील लहान मुलीची छेड काढल्याच्या संशयावरुन अनिल खंडारे याला बेदम मारहाण केली होती. यावेळी पत्नी सुनीता हिने धाव घेऊन पतीची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता. मला लहान मुले आहेत, पतीला मारु नका अशी विनंती करीत असतानाही या पाच जणांनी अनिल याला मार सुरुच ठेवला होता. यावेळी अनिल याचा भाऊ व वहिणी यांनीही आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी दयामया न दाखविता अनिल याला जखमी अवस्थेत जामनेर रस्त्यावरील एका विहिरीत फेकून दिले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पत्नी सुनीता खंडारे यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलीस स्टेशनला पाच जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.प्रत्यक्षदर्शी साक्षीदारच ठरले पुरावेतपासाधिकारी व्ही.आर.शित्रे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गुन्हा सिध्द करण्यासाठी मृत अनिल याची पत्नी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुनीता खंडारे, भाऊ वसंत कडू खंडारे, वहिणी लताबाई सुनील खंडारे याशिवाय डॉ.रवींद्र कडू पाटील, तपासाधिकारी व्ही.आर.शित्रे व अशोक उतेकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. शवविच्छेदन अहवाल पुरावा ठरला.अशी आहे शिक्षा व दंडसर्व आरोपींना ३०२ सह १४९ नुसार दोषी धरुन जन्मठेप, प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसाचा साधा कारावास व १४७ अन्वये दोन वर्ष सश्रम कारावास, प्रत्येकी २०० रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास, ३२३ अन्वये सहा महिने कारावास व प्रत्येकी १०० रुपये दंड, दंड भरल्यास सात दिवस कैदेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.निलेश दयाराम चौधरी यांनी कामकाज पाहिले. अ‍ॅड.एस.जी.काबरा यांनी काही आरापींची सरतपासणी घेतली होती. पैरवी अधिकारी म्हणून शालीग्राम पाटील यांनी सहकार्य केले. बचावपक्षातर्फे अ‍ॅड.कृष्णा बनकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव