वढोदा जंगलात पाच मोरांना विषबाधा

By Admin | Updated: June 9, 2017 12:50 IST2017-06-09T12:50:04+5:302017-06-09T12:50:04+5:30

दोन मोरांचा मृत्यू तर तिघांवर उपचार सुरु

Five peacocks poisoning in the Wilderness Forest | वढोदा जंगलात पाच मोरांना विषबाधा

वढोदा जंगलात पाच मोरांना विषबाधा

ऑनलाईन लोकमत

फैजपूर, ता़यावल- वढोदा प्ऱयावल येथील जंगलात पाच मोरांना विषबाधा झाल्याने दोन मोरांचा मृत्यू झाला तर तिघांना वेळीच उपचारार्थ हलवण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचल़े शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़
दरम्यान, मोरांवर विषबाधेचा प्रयोग झाला की अन्य कुठल्या कारणाने त्यांना विषबाधा झाली याचा शोध वनविभागाचे अधिकारी घेत आहेत़ शुक्रवारी जंगलात पाच मोरांना विषबाधा झाल्याची बाब मजूर नंदू सोनू सपकाळे व बापू सपकाळे (वढोदा) यांच्या लक्षात आली़ यावेळी दोन मोरांचा मृत्यू झाल्याने त्यांनी तातडीने तीन मोरांना फैजपूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी हलवल्याने त्यांचे प्राण वाचल़े 
दरम्यान, दोन मयत मोरांचा पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी रवाना झाले असून कारणांचा शोध घेतला जात आह़े

Web Title: Five peacocks poisoning in the Wilderness Forest