म्यूकरचे पाच रुग्ण झाले बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST2021-07-19T04:12:12+5:302021-07-19T04:12:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे म्यूकरमायकोसिस आजारातून बरे झालेल्या पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ...

म्यूकरचे पाच रुग्ण झाले बरे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे म्यूकरमायकोसिस आजारातून बरे झालेल्या पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळाल्याने या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये दाखल झालेले पाच रुग्ण सी-२ या कक्षामध्ये उपचार घेत होते. त्यांना म्यूकरमायकोसिस आजारामुळे गंभीर अवस्थेत उपचार सुरू होते. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर यशस्वी उपचार करीत त्यांना बरे केले आहे. या रुग्णांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिचार्ज देण्यात आला.
उपचार करणेकामी म्यूकरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधवैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, दंत शल्य विभागाचे प्रमुख डॉ. इम्रान पठाण, कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राउत, सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, आदींनी परिश्रम घेतले. तसेच सी-२ कक्षाचे इन्चार्ज अधिपरिचारिका वैशाली पाटील, प्राजक्ता कांबळी, गिरीश बागुल, पूजा वायल, माधुरी सुरवाडे, प्रियांका मेढे, सुरेखा परदेशी, गायत्री बहिरम, अनुजा कदम, अंकित बनकर यासह कंत्राटी कर्मचारी प्रफुल्ल नेरकर, मयूर महाजन, शंकर सोनवणे, अमोल तायडे, संतोष चौधरी, आदींनी रुग्णसेवेसाठी सहकार्य केले.