चैत्र शुद्ध नवोदशीला 5 लाख भाविकांची ईच्छापूर्ती

By Admin | Updated: April 10, 2017 16:51 IST2017-04-10T16:51:01+5:302017-04-10T16:51:01+5:30

महाराष्ट्राच्या सिमेला असलेल्या मध्यप्रदेशातील ईच्छापूर येथील ईच्छादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारपासून थाटात प्रारंभ झाला.

Five lakh devotees wish to devote to Chaitra Navodashi | चैत्र शुद्ध नवोदशीला 5 लाख भाविकांची ईच्छापूर्ती

चैत्र शुद्ध नवोदशीला 5 लाख भाविकांची ईच्छापूर्ती

 ईच्छादेवीचा यात्रोत्सव : सातपुडा पर्वतावर 125 फूट उंच मंदिर

अंतुर्ली,ता.मुक्ताईनगर,दि.10 - महाराष्ट्राच्या सिमेला असलेल्या मध्यप्रदेशातील ईच्छापूर येथील ईच्छादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारपासून थाटात प्रारंभ झाला. भाविकांची ईच्छा पुर्ण करणा:या ईच्छादेवीचे प्राचीन मंदिर सातपुडा पर्वतावर ईच्छापूर गावापासून दक्षिणेला सुमारे दीड कि.मी.अंतरावर आहे. 
मंदिर सातपुडा पर्वतावर 125 फूट उंच आहे. मंदिराच्या विकास कामासाठी मध्यप्रदेश शासनाने एक कोटीचा निधी दिला आहे. यातून बरीचशी विकास कामे झाली आहेत. मंदिरात वर्षातून दोन वेळा मोठे उत्सव साजरे केले जातात. सकाळी सात वाजता देवीची आरती झाल्यानंतर शाहपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक जे.पी.मनसुरे, पोलीस उपनिरीक्षक रेखा वासके, पंचायत समिती सदस्य नामदेव महाजन, सरपंच युवराज भिल्ल यांनी देवीचे दर्शन घेतले. 
चैत्र शुद्ध नवोदशीला देवीची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या एक दिवस आधी निमसाडय़ा कार्यक्रम पाहण्यासारखा असतो. देवीच्या दर्शनासाठी भाविक मध्यप्रदेश व महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणावर येतात. 
यात्रोत्सवाला 9 पासून सुरूवात झाली असून चार दिवस यात्रा चालणार आहे. प्राचीन काळापासून माणूस तेजाची, शक्तीची उपासना करीत आहे. यात देवी हे शक्तीचेच रुप असल्यामुळे देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. पुराणात तापी महात्म्याच्या सातव्या अध्यायनात ईच्छापूर महात्मा वर्णिले आहे. एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. ईच्छादेवी देवस्थान 500 वर्षे प्राचीन आहे. त्याचे निर्माण कार्य एक मराठा सुभेदाराने केले. 
सर्व कार्यक्रम सुरळीत पार पाडावे व भाविकांच्या सोयीसाठी ट्रस्टची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली. मंदिराच्या दक्षिणेला पर्वताच्या पायथ्याशी एक महानतीर्थ आहे. तेथे स्नान केल्याने पाप नष्ट होऊन अन्तशुद्धी होते. 
पाच लाखापेक्षा अधिक भाविक देवीचे दर्शन घेतील, असे ट्रस्टचे अध्यक्ष फकीरा तोरे, उपाध्यक्ष भागवत महाजन, सचिव मेहरा पातोंडीकर यांनी सांगितले. गो-शाळा ट्रस्टमार्फत चालवली जाते तिची देखभाल डी.के.पंडीत, विश्वनाथ निंबाळकर, समाधान चौधरी हे करतात.  (वार्ताहर)

Web Title: Five lakh devotees wish to devote to Chaitra Navodashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.