भुसावळ तालुक्यात लांडग्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 18:15 IST2018-11-03T18:13:45+5:302018-11-03T18:15:31+5:30
लांडग्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे तळवेल, ता.भुसावळ येथे घडली.

भुसावळ तालुक्यात लांडग्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार
ठळक मुद्देघटनास्थळी वनविभागाच्या यंत्रणेची भेट४० हजार रुपयांचे झाले नुकसान
वरणगाव, ता.भुसावळ : लांडग्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे तळवेल, ता.भुसावळ येथे घडली.
तळवेल गावाशेजारील गोठ्यात शनिवारी पहाटे लांडग्याने गोठ्यात शिरून गोठ्यातील पाच शेळ्यांचे लचके तोडून ठार केले.
याबाबत शेळीमालक विलास संतोष सपकाळे यांनी तक्रार दिली. वनपाल एल.डी.गवळी वनरक्षक व मुकेश बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला. यात शेळीमालकाचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.