जळगावात भाजपच्या पाच कार्यकर्त्याना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:39 PM2018-08-07T12:39:21+5:302018-08-07T12:41:05+5:30

मनपा निवडणुकीत भाजपाचा प्रचार केला नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या प्रकरणात सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली.

Five BJP workers arrested in Jalgaon | जळगावात भाजपच्या पाच कार्यकर्त्याना अटक

जळगावात भाजपच्या पाच कार्यकर्त्याना अटक

Next
ठळक मुद्देजळगाव मनपा निवडणुकीतील प्रचाराचा वादशिवसेनेच्या कार्यकत्याला मारहाणशनिवारी झाला गुन्हा दाखल

जळगाव : मनपा निवडणुकीत भाजपाचा प्रचार केला नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या प्रकरणात सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली. शुक्रवारी रात्री मतमोजणीच्या दिवशी रात्री झालेल्या वादप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल झाला होता.
गोपाळ गोविंदा सोनवणे (वय २९), मनोज प्रभाकर निंबाळकर (वय ३२), जयेश बापु पाटील (वय ३४) तिन्ही रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव, करण उर्फ मोन्या संतोष शर्मा (वय २०, रा. नागसेन कॉलनी, जळगाव) व आनंदा अशोक अहिरे (वय २२, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी अटक केलेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत. वैभव अधिक पाटील हा शिवसेनेचा कार्यकर्ता असून त्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. भाजपाचा प्रचार केला नाही, म्हणून या पाच जणांनी वैभव याला शुक्रवारी रात्री दहा वाजता कस्तुरी हॉटेल व स्वामी समर्थ केंद्राजवळ हा मारहाण केली होती.
या गुन्ह्यातील पाचही जणांना पोलीस उपनिरीक्षक रोहन खंडागळे यांनी सोमवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Web Title: Five BJP workers arrested in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.