शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आमदारासह पाच भाजप पदाधिकाऱ्यांची खडसेंनी केली नड्डा यांच्याकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 06:13 IST

कार्याध्यक्षांकडे पुरावेही केले सादर

अजय पाटील 

जळगाव : माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेवून, पक्षविरोधी काम करणाºया जिल्ह्यातील ५ भाजप पदाधिकाऱ्यांची तक्रार केली असल्याची माहिती पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात एका आमदाराचाही समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात भाजप उमेदवार अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या पराभवामागे पक्षातीलच पदाधिकाºयांचा हात असल्याचे खडसे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. याबाबत चार दिवसांपूर्वी खडसे यांनी नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली.नड्डा यांच्याकडे पाच पदाधिकाºयांची नावे देत, काही पुरावे देखील खडसेंनी सादर केले आहेत. याबाबत आता पक्षनेतृत्वाकडून संबधितांवर काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे. पाचही पदाधिकारी दिग्गज आहेत. त्यांच्या नावांमुळे पक्षनेतृत्व कारवाई करण्यास उशीर करत असल्याचे बोलले जात आहे. तसेच याबाबत संपूर्ण चौकशी व तक्रारीची पूर्णपणे शहानिशा करूनच कारवाई होईल, असेही पक्षाच्या सूत्रांकडून सांगितले जात आहे. या पाच पदाधिकाºयांमध्ये एका विद्यमान आमदाराचा समावेश आहे. यासह जि.प.चे आजी व माजी पदाधिकारी, एक माजी आमदार व पक्ष संघटनेतील एका पदाधिकाºयाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही पदाधिकाºयांची गुरुवारी बैठक झाली. नड्डा यांच्याकडून जर याबाबतचा काही खुलासा आला किंवा बोलविण्यात आले, तर काय भूमिका मांडायची याबाबत चर्चा करण्यात आली.खडसे स्वगृहीच ?च्नड्डा यांच्यासोबतच्या भेटीनंतर खडसे यांचे सूर बदलले आहेत. खडसे पक्ष सोडणार नसल्याचे भाजप पदाधिकाºयांचा चर्चेतून बोलले जात आहे. च्खडसेंनी आपल्या समर्थक आमदार व भाजपच्या पदाधिकाºयांशी देखील याबाबत चर्चा केली होती. मात्र, त्यांनी खडसे यांना पक्ष न सोडण्याचा सल्ला दिला. तसेच पक्षविरोधी काम करणाºयांवर कारवाई झाल्यास त्यांचे चेहरेही समोर येतील, असेही खडसे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाMLAआमदार