भुसावळात दुचाकीचोरांकडून पाच दुचाकी जप्त

By Admin | Updated: April 13, 2017 13:38 IST2017-04-13T13:38:57+5:302017-04-13T13:38:57+5:30

दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली़

Five bike seized from two-wheelers in Bhusaval | भुसावळात दुचाकीचोरांकडून पाच दुचाकी जप्त

भुसावळात दुचाकीचोरांकडून पाच दुचाकी जप्त

 जळगाव,दि.13- दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ आरोपींनी मध्यप्रदेशातून या दुचाकी चोरल्या असून बाजारपेठ पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत़ मयूर विलास उर्फ उल्हास भंगाळे (गरूड प्लॉट, भुसावळ) व पुष्पक गोपाळ  भंगाळे (भुसावळ हायस्कूलजवळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश बाविस्कर, राहुल चौधरी, दीपक जाधव, बंटी कापडणे, प्रशांत चव्हाण, हवालदार युनूस शेख आदींनी ही कारवाई केली़ गुरनं़11/2017 मध्ये भुसावळातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली होती मात्र त्यांनी मध्यप्रदेशासह अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली़

Web Title: Five bike seized from two-wheelers in Bhusaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.