शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

भाजपाकडून युतीच्या दृष्टीने पहिले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 12:10 IST

सलग दुस:या दिवशीही गुलाबरावांचे छायाचित्र असलेले बॅनर कायम

जळगाव : भाजपाच्या बॅनरवर शिवसेनेचे उपनेते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील झळकल्यानंतर भाजपाच्याच काही कार्यकत्र्यानी नाराजी व्यक्त करुन देखील शहरात हे बॅनर्स दुस:या दिवशीही कायम होते. यामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला असून स्थानिक पातळीवर शिवसेनेशी भाजपाचे राजकीय समीकरणे जुळत असल्याची बाब ‘बॅनर’ मुळे अधिक स्पष्ट जाणवू लागली आहे. अनावधानाने नव्हे तर ठरवूनच गुलाबरावांचे छायाचित्र बॅनरवर घेण्यात आले असून युतीच्या दृष्टीने हे पाऊल असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 30 मार्च रोजीचा जळगाव दौरा तसेच 6 एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत होणा:या कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर शहरात भाजपाकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सवर गुलाबराव पाटील यांचा फोटो झळकला. एवढेच नाही तर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या फोटोच्या आधी गुलाबराव यांचा फोटो झळकल्याने खडसे यांच्या समर्थकांनी क्रमवारीबाबत आक्षेप घेतल्यावर सुद्धा पक्षातील कार्यकत्र्याची नाराजी न जुमानता लावलेले बॅनर्स शहरात दुस:या दिवशीही कायम होते. दरम्यान कार्यकत्र्याच्या नाराजीवर भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी स्पष्ट केले की, हा शासकीय कार्यक्रम असून देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात गुलाबराव पाटील हे राज्यमंत्री आहेत. त्यामुळे बॅनरवर यांचा फोटो लावला. प्रोटोकॉल पाळून फोटो घेतला आहे. यामध्ये कोणताही राजकीय दृष्टीकोन नाही. असे असले तरी युतीच्या दृष्टीने हे पाऊल असल्याचे मानले जात आहे. सद्यस्थितीत मिनी मंत्रालय समजल्या जाणा:या जिल्हा परिषदेत शिवसेना व भाजपाची युती आहे. आगामी काळात विधासभा व लोकसभेपूर्वीच महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती असावी अशी अनेक पदाधिकारी व कार्यकत्र्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षातील काही पदाधिकारी व नेत्यांनी आतापासूनच प्रय} करायला सुरुवात केली आहे.काही दिवसापूर्वी बुलडाणा जिल्ह्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनीच महापालिका निवडणुकीत युतीचे संकेत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना दिले होते. जिल्ह्यात भाजपाचे गिरीश महाजन, शिवसेनेचे सुरेशदादा जैन यांच्यात सलोख्याचे व मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तसेच गुलाबराव पाटील हे सरकारमधीलच मित्र पक्षाचे मंत्री असल्याने त्यांचा बॅनरवरील फोटो गैर नसल्याचे एका गटाचे म्हणणे आहे.जामनेरात शिवसेनेची भाजपाला साथ जामनेर नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवू अशी घोषणा केल्यावरही शिवसेनेने फक्त एकाच जागेवर उमेदवार देवून भाजपाला एकप्रकारे साथच दिली आहे. मतांचे विभाजन होवून भाजपाला फटका बसू नये हीच काळजी शिवसेनेने घेतल्याचे बोलले जात आहे. या कारणाने देखील भाजपा गुलाबरावांना जवळ करीत असल्याची चर्चा आता रंगत आहे. शिवसेनेशी गट्टीगुलाबरावांचे छायाचित्र असलेले बॅनर अनावधानाने लागले असते तर ते तत्काळ हटविण्यात आले असते, मात्र शहरात ठिकठिकाणी हे बॅनर सलग दुस:या दिवशीही कायम होते. याचा अर्थ भाजपातर्फे हे बॅनर ठरवून लावण्यात आल्याचे उघड झाले आहे. भाजपा व सेनेतील युतीच्या दृष्टीने पडलेले हे पहिले पाऊल मानले जात आहे. मनपात युतीची तयारीभाजपाच्या जिल्हा बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर भाजपाचाच होणार असे म्हणत मित्र पक्ष संपवा असे विधान केले होते. वरवर शिवसेनेला विरोध दर्शवत असताना मनपा निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय वरिष्ठांशी बोलून घेतला जाईल, असेही भाजपाकडून सांगितले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेशी जळगाव मनपा निवडणुकीत युतीला अनुकूलता दर्शवली आहे. युतीच्याच दृष्टीने गुलाबरावांशी जवळीक भाजपा साधत असल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील असलेले सख्य हे देखील या निमित्ताने पुढे येवू लागले आहे.
टॅग्स :Jalgaonजळगाव