देवयानी चंद्रकांत माळी चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:18 IST2021-08-23T04:18:48+5:302021-08-23T04:18:48+5:30
जळगाव जिल्ह्यातून व राज्यातून तिच्या चित्राची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल अध्यक्ष उमेश करोडपती, सचिव ...

देवयानी चंद्रकांत माळी चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम
जळगाव जिल्ह्यातून व राज्यातून तिच्या चित्राची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल अध्यक्ष उमेश करोडपती, सचिव डॉ. सचिन बडगुजर, मुख्याध्यापक हेमंत कुमार बी. पाटील, विजय बडगुजर आदींनी या विद्यार्थिनीचे कौतुक व अभिनंदन केले. राज्य शिक्षक सेनेच्या वतीने नितीन बानुगडे पाटील व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा व कोल्हापूर या जिल्ह्याच्या वतीने ही राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय पारितोषिक प्रमाणपत्र, ५०१ रुपये रोख देऊन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, शिक्षक सेना तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, बापू महाजन, विक्रांत पाटील, मनवंत साळुंखे, लक्ष्मीकांत पाटील, धनेश पाठक यांनी घरी सत्कार केला. यावेळी तिचे आई-वडील उपस्थित होते.