नाटकाच्या पहिल्याच प्रयोगात ‘वादाची घंटी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 01:08 IST2017-07-04T01:08:13+5:302017-07-04T01:08:13+5:30
अमळनेर : अखेर नाटय़गृहाचा पडदा उघडला, पहिल्या प्रयोगाला रसिकांची ब:यापैकी उपस्थिती, दर्जेदार नाटके येतील अशी अपेक्षा

नाटकाच्या पहिल्याच प्रयोगात ‘वादाची घंटी’
अमळनेर : अमळनेरची ओळख प्रतिपंढरपूरप्रमाणेच नाटय़पंढरी म्हणूनही आहे. येथे उभारण्यात आलेले नाटय़गृह रसिकांच्या सेवेत कधी रुजू होते याची प्रतीक्षा लागून होती. अखेर ती प्रतीक्षा आज संपली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहाचा पडदा रात्री 9 वाजता उघडला. पहिलाच प्रयोग ‘युगपुरुष, महात्मांचे महात्मा’ हा झाला. या प्रयोगाला रसिकांचा ब:यापैकी प्रतिसाद मिळाला. मात्र या पहिल्याच प्रयोगात शाब्दिक वादाची घंटी वाजल्याने रसिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
अमळनेरकर रसिकांना नाटकांची असलेली आवड, त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, येथेही नाटय़गृह उभारणीसाठी प्रय} सुरू झाले. शहराच्या मध्यवर्ती भागात नाटय़गृहासाठी जागा मिळाली. हे नाटय़गृह जवळपास 1300 आसनांचे आहे. जळगाव, धुळे येथील नाटय़गृहापेक्षाही हे नाटय़गृह मोठे आहे. हे नाटय़गृह वातानुकूलित आहे. नाटय़गृहाच्या उभारणीसाठी अनेकांचा हातभार लागला. ब:याच कालावधीनंतर नाटय़गृहाचे काम पूर्ण झाले. नाटय़गृह पूर्ण झाले, मात्र नाटकाची पहिली घंटा कधी वाजणार याची रसिकांना प्रतीक्षा लागून होती. अखेर आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला नाटय़गृहाचा ‘पडदा’ उघडला. पहिलाच प्रयोग रामचंद्र मिशन धरमपूर प्रस्तुत ‘युगपुरुष, महात्मांचे महात्मा’ याचा झाला. नाटक सुरू होण्यापूर्वी स्थानिक कलाकार अभिजित मगरे, भाग्यश्री पाटील, प्रकाश पाटील यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते नाटय़प्रयोगाचे उद्घाटन झाले. या वेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, बांधकाम सभापती मनोज पाटील, मोरया नाटय़ संस्थेचे अध्यक्ष संदीप घोरपडे, चेतन सोनार, राजेश पाटील, महेंद्र पाटील, महेश पाटील, चेतन शहा, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकूळ पाटील यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
दरम्यान, नाटक सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
1 अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचे नाटक सुरू होण्यापूर्वी शाब्दिक वाद झाला. नगरसेवक मनोज पाटील भाषण करीत असताना, संदीप घोरपडे उभे राहून म्हणाले की, शहराची दिशाभूल करू नका. ज्यांनी प्रय} केले, त्यांचे नाव न घेता इतरांचे नाव घेतले. तेव्हा मनोज पाटील म्हणाले, राजकारण करू नका.
2 वाद वाढू नये म्हणून मान्यवर व्यासपीठावरून खाली उतरले. फक्त आमदार थांबले. त्यांनी माईक हातात घेऊन सांगितले की, मी आलो तेव्हा हे नाटय़गृह अपूर्ण होते. संदीप घोरपडे यांनी मला लक्ष द्यायला सांगितले. मी पाच कोटींचा निधी आणला तेव्हा नाटय़गृह पूर्ण झाले.