पहिल्या टप्प्यात आज
By Admin | Updated: September 21, 2015 00:28 IST2015-09-21T00:28:48+5:302015-09-21T00:28:48+5:30
बंदोबस्ताचे नियोजन : दुसरा टप्पा बुधवारी

पहिल्या टप्प्यात आज
नंदुरबार : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 253 गणेश मंडळांतर्फे विसजर्न मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक 126 सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश आहे. पोलिसांनी बंदोबस्ताच्या दृष्टीने नियोजन केले आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्याचे गणेश विसजर्न पाचव्या दिवशी अर्थात सोमवार, 21 रोजी होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागातील गणेश मंडळांचा समावेश आहे. एकूण 253 गणेश मंडळांचा समावेश राहणार असून त्यातील निम्मेपेक्षा अधिक मंडळे मिरवणुका काढणार आहेत. पोलीस ठाणेनिहाय मंडळे अशी, सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये नंदुरबार शहरात 34, तालुक्यात चार, उपनगर ठाणेअंतर्गत 13, नवापूर पोलीस ठाण्याअंतर्गत 11, विसरवाडीअंतर्गत आठ, शहादा पोलीस ठाण्याअंतर्गत 15, सारंगखेडा नऊ, म्हसावद 10, तळोदा 22 असे एकूण 126 सार्वजनिक मंडळे. खासगी मंडळांमध्ये शहरात एक, तालुकाअंतर्गत तीन, उपनगरअंतर्गत तीन, नवापूर व विसरवाडी प्रत्येकी एक, अक्कलकुवा तीन, तळोदा 28 अशा एकूण 40 मंडळांचा समावेश आहे. एक गाव एक गणपतीअंतर्गत उपनगर क्षेत्रात दोन, नवापूर 11, विसरवाडी 16, म्हसावद 10, धडगाव एक, अक्कलकुवा 12, तळोदा 33, तर मोलगी पोलीस ठाण्याअंतर्गत दोन ठिकाणी असे एकूण 87 ठिकाणी एक गाव एक गणपतीचे विसजर्न करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनातर्फे सांगण्यात आले.