वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता मिळाला, पालिका कर्मचाऱ्यात आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:19 IST2021-09-03T04:19:01+5:302021-09-03T04:19:01+5:30
अमळनेर : नगरपरिषदेत सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा पहिला हप्ता एकूण १ कोटी ६० लाख २९ हजार ५२४ रुपये ...

वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता मिळाला, पालिका कर्मचाऱ्यात आनंद
अमळनेर : नगरपरिषदेत सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा पहिला हप्ता एकूण १ कोटी ६० लाख २९ हजार ५२४ रुपये कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
पालिकेतील ३६५ सफाई कामगार यांना ६४ लाख ४४ हजार ६५६ रुपये व २०८ कार्यालयीन कर्मचारी यांना ४६ लाख ९७ हजार ४४३ रुपये व ५८७ निवृत्त कर्मचारी यांना ४८ लक्ष ८१ हजार ४२३ रुपये माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पुढाकाराने मिळाले. नगराध्यक्षा पुष्पलता साहेबराव पाटील व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या हस्ते ते वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघ भारतीय कर्मचारी महासंघ(इंटक) या कर्मचारी संघटनांच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, आस्थापना प्रमुख नेहा पाटील, लेखापाल चेतन गडकर, संवर्ग अधिकारी परमार व या कामी आस्थापना व लेखा विभागातील कर्मचाऱ्यांचा तसेच या कामी पाठपुरावा करून सहकार्य करणारे नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्र. अधिकारी संजय चौधरी व संघटनेचे सोमचंद संदानशिव, प्रसाद शर्मा, अविनाश संदानशिव, चंद्रकांत संदानशिव, प्रवीण शेलकर, दिनेश बिऱ्हाडे, मंगल सपकाळे, गोपाळ बिऱ्हाडे, राजेंद्र संदानशिव, भरत सोनवणे, संजय बिऱ्हाडे, योगेश बिऱ्हाडे व कर्मचारी उपस्थित होते.