वरखेडी येथील बहुळा नदीला पहिला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:34+5:302021-09-06T04:19:34+5:30
वरखेडी, ता. पाचोरा : बहुप्रतीक्षेनंतर वरखेडी येथील बहुळा नदीला पहिला पाण्याचा पूर आला. शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे ...

वरखेडी येथील बहुळा नदीला पहिला पूर
वरखेडी, ता. पाचोरा : बहुप्रतीक्षेनंतर वरखेडी येथील बहुळा नदीला पहिला पाण्याचा पूर आला. शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे भल्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास नदीला आलेला पूर फरशी पुलावरून प्रवाहित होणारा पहिला पूर होता. पूर बघण्यासाठी दोन्ही बाजूंनी नागरिक जमा झाले होते. पुराचे पाणी ओसरल्याने काही तरुणांनी जीव धोक्यात घालून नदी पार केली.
हा फरशी पूल जीर्ण झाला असून, पुराच्या पाण्यामुळे कुठे भगदाड पडले आहे की काय, हे कळून येत नसल्याने पुराच्या पाण्यातून वाट काढणाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो आणि ही परिस्थिती वर्षानुवर्षापासून वाहनधारक तथा पादचारी यांना अनुभवास येते; परंतु आनंदाची बाब अशी आहे की, याठिकाणी पूरहानी योजनेत नवीन व उंच, तसेच दोन्ही दिशेला खोली न राहता समांतर जोडणी करणारा पूल मंजूर झाला असून, जवळजवळ एक कोटी रुपये खर्चातून नवीन पुलाची निर्मिती केली जाणार आहे.
या पुलाच्या कामाची वर्कऑर्डरदेखील निघाली आहे; परंतु पावसाळा सुरू असल्याने तूर्तास हे काम थांबले आहे.
050921\img_20210905_073759.jpg~050921\05jal_2_05092021_12.jpg
वरखेडी बहुळा नदीवरील कमी उंचीचा पुल.पुलावरून पुराचे पाणी असल्यास वाहतूक प्रभावित होते.~वरखेडी येथील बहुळा नदीला पहिला पूर