खाविआ प्रस्तावावर ठाम
By Admin | Updated: October 12, 2015 00:38 IST2015-10-12T00:38:28+5:302015-10-12T00:38:28+5:30
मनपा स्थायी समिती सभापतीपदाचा खान्देश विकास आघाडीने दिलेला प्रस्ताव नाकारत भाजपाने अवघ्या 15 सदस्यांच्या बळावर महापौरपदावर दावा केला आहे.

खाविआ प्रस्तावावर ठाम
जळगाव : मनपा स्थायी समिती सभापतीपदाचा खान्देश विकास आघाडीने दिलेला प्रस्ताव नाकारत भाजपाने अवघ्या 15 सदस्यांच्या बळावर महापौरपदावर दावा केला आहे. मात्र खाविआ आपल्या प्रस्तावावर ठाम असून शेवटच्या क्षणार्पयत भाजपाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचे उपमहापौर सुनील महाजन यांनी सांगितले. खाविआने स्थायी समिती सभापतीपद भाजपाला देण्याची तयारी दर्शविली असून त्याबदल्यात भाजपाने महापौर व उपमहापौरपदासाठी खाविआला पाठिंबा जाहीर करण्याची मागणी केली होती. तसा प्रस्ताव भाजपाचे भगत बालाणी यांना अनौपचारिक चर्चेत दिला होता. त्यावर बालाणी यांनी मात्र जाहीर पत्रक काढून शहर विकासासाठी खाविआने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून भाजपाला दोन्ही पदे देण्याची मागणी केली आहे. महापौरपदाचा दावा चुकीचा असल्याचे सांगत ती मागणी खाविआने फेटाळली आहे. तर बिनविरोध निवड शक्य स्थायी समितीत खाविआ 8 व भाजपा, मनसे, राष्ट्रवादी तिघे एकत्र आले तरीही 7 मते होत असल्याने खाविआच्या उमेदवाराची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे भाजपातर्फे उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी आहे. तसे झाल्यास खाविआचे नितीन बरडे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड होणार आहे.