शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
3
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
4
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
5
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
6
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
7
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
8
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
9
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
11
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
12
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
13
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
14
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
15
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
16
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
18
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
19
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

फटाक्यांचे भाव यंदा स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:48 AM

विविध प्रकारचे फटाके बाजारपेठेत दाखल

ठळक मुद्देचीनचे फटाके विक्री न करण्याच्या निर्धारविविध प्रकारचे फटाके वेधताहेत लक्ष

जळगाव : दिवाळीसाठी फटाके बाजारपेठेत दाखल झाले आहेत. इंधन दरवाढीमुळे विविध वस्तूंमध्ये भाववाढ होत असली तरी फटाक्यामध्ये कोणतीही भाववाढ न होता त्यांचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील चीनचे फटाके विक्री न करण्याचा निर्धार विक्रेत्यांनी केला आहे.साधारण ११० रुपयांपासून ते तीन हजार रुपये किंमतीचे फटाक्यांचे खोके (बॉक्स) बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहेत. लहान फटाके, रंगबेरंगी फटाके तसेच मोठे बॉम्ब असे विविध प्रकारचे फटाके असलेले हे बॉक्स सध्या आकर्षण ठरत असून त्या सोबतच सुट्या फटाक्यांनाही मागणी असल्याचा दरवर्षीचा अनुभव असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ९ वस्तूंचा गिफ्ट बॉक्स ११० रुपये, १८ वस्तूंचा बॉक्स २०० रुपये, २६ वस्तूंचा बॉक्स ३७५ रुपये, ३८ वस्तूंचा बॉक्स ६००रुपये व त्यापेक्षाही मोठे बॉक्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत.चीनच्या फटाक्यांना यंदाही नकारचीनच्या फटाक्यांची यंदाही विक्री केली जाणार नाही असा निर्धार जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशने केला असून बाजारपेठेत फटाके आले असले तरी त्यात चीनच्या फटाक्यांना स्थान देण्यात आले नसल्याचेही सांगण्यात आले. या संदर्भात महाराष्ट्र फटाका असोसिएशनची पुणे येथेही बैठक झाल्यानंतर तशा सूचना देण्यात आले असल्याचे असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले.विविध प्रकारचे फटाके वेधताहेत लक्षबाजारपेठेत दाखल झालेल्या फटाक्यांमध्ये फॅन्सी फटाके, विविध प्रकारचे रॉकेट तसेच फ्लॉवर पॉटमध्ये रंगीला, बो-बो, क्रॉकलिंग, मल्टी कलर पॉट तर चक्करमध्ये २५ शॉटस्, ५० शॉटस्, १०० शॉटस्, २०० शॉटस्, ५०० शॉटस् हे फटाके आकर्षण ठरत असून त्यांना जास्त मागणी असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीच्या १० दिवस अगोदर फटाके खरेदीसाठी दरवर्षी गर्दी होत असते, मात्र यंदा त्यापूर्वीच होलसेल विक्रीसह किरकोळ विक्रीस सुरुवात झाली आहे. यंदा दुष्काळी स्थिती जाणवत असली तरी मुलांचा हट्ट पुरविण्यासाठी फटाक्यांची खरेदी केली जात असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.दिवाळीसाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे फटाके बाजारपेठेत दाखल झाले असून यंदा फटाक्यामध्ये कोणतीही भाववाढ झालेली नाही. पाऊस कमी असला तरी मुलांसाठी पालकवर्ग फटाक्यांची खरेदी करीत असल्याने फटाक्यांना चांगली मागणी आहे.- युसुफ मकरा, कार्याध्यक्ष, जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशन.

टॅग्स :fire crackerफटाकेJalgaonजळगाव