आॅनलाईन लोकमतजळगाव : शहर पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या फुले मार्केटच्या नूतन कलेक्शन या रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आग लागली. क्षणातच बाहेर आगीचे लोळ येवू लागल्याने सर्वत्र धावपळ उडाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीची झळ शेजारच्या दुकानांनाही बसली आहे.फुले मार्केटमध्ये कांतीभाई डेडीया यांच्या मालकीचे नूतन ड्रायफूट व नूतन कलेक्शन असे दोन दुकाने आहेत. एकाच दुकानात दोन दुकान तयार करण्यात आले आहे. वरच्या मजल्यावर कपड्यांच्या दुकानात ए.सी.जवळ अचानक शार्ट सर्कीट होऊन आगीची भडका उडाला. प्लास्टीक व कापड असल्याने आग लवकर पसरली. पोलीस स्टेशनसमोरच आग लागल्याचे लक्षात येताच कॉन्स्टेबल राजेश पाटील यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून पाण्याचे बंब मागविले.चार बंबाद्वारे विझविली आगआगीची स्वरुप मोठे असल्याने एका मागून एक असे अग्निशमन दलाचे चार बंब लागले. अग्निशमन कर्मचारी सुनील मोरे, शशिकांत बारी, देविदास सुरवाडे, प्रकाश चव्हाण, केशव चौधरी, रोहीदेस चौधरी, जगदीश साळुंखे, शिवाजी तायडे व भगवान पाटील यांनी जीव धोक्यात घालून आग विझविली. पोलीस कर्मचारी दीपक सोनवणे व रतन गिते या दोघांनीही दुकानातील लोकांना सुरक्षित बाहेर काढले.दुचाकींचेही नुकसानया आगीमुळे दुकानाच्या बाहेर लावलेल्या चार दुचाकींचे नुकसान झाले. तसेच नूतन कलेक्शनच्या मागील बाजुस असलेल्या विद्या गारमेंटस् व सनी या दोन दुकानांचे तसेच जनता शॉपी या दुकानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. दीड ते दोन लाखाच्यावर कपडे जळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेमुळे गांधी मार्केटकडे जाणारा रस्ता व टॉवरकडे येणारा रस्ता कोंडीमुळे बंद झाला होता. टॉवर चौकातही वाहतूक कोंडी झाली होती.
जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये कपड्यांच्या दुकानात अग्नितांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 22:08 IST
शहर पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या फुले मार्केटच्या नूतन कलेक्शन या रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आग लागली. क्षणातच बाहेर आगीचे लोळ येवू लागल्याने सर्वत्र धावपळ उडाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये कपड्यांच्या दुकानात अग्नितांडव
ठळक मुद्दे लाखो रुपयांचे कपडे जळून खाक शहर पोलीस स्टेशनसमोर रस्त्यावर वाहतूक कोंडी चार बंबाद्वारे विझविली आग