अग्निशमन विभागाकडे साधनांची वानवा

By Admin | Updated: January 12, 2015 13:34 IST2015-01-12T13:22:36+5:302015-01-12T13:34:15+5:30

अग्निशमन विभागाकडे आवश्यक असलेले साहित्य प्रशासनाने तातडीने खरेदी करावे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांची आहे.

Fire Fighting Systems | अग्निशमन विभागाकडे साधनांची वानवा

अग्निशमन विभागाकडे साधनांची वानवा

 साहित्य पुरवण्याची मागणी

अग्निशमन विभागाकडे आवश्यक असलेले साहित्य प्रशासनाने तातडीने खरेदी करावे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी कर्मचार्‍यांची आहे. आज विभागाकडे फक्त २ अँसबेस सूट आहेत. तर ब्रिडींग अँपट्रेस एकही नसल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शहराच्या सुरक्षिततेत मोलाचा सहभाग घेणार्‍या अग्निशमन विभागाला आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जळगाव : महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे आवश्यक साहित्यच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. 
आपत्कालीन परिस्थिती तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेकडून अग्निशमन विभागाची स्थापना करण्यात आली. कर्मचारी, वाहने, साहित्य, प्रशिक्षण, जागा या सर्व बाबींचा यात साहजिकच समावेश झाला. मात्र तांबापूरा येथे झालेली वायूगळती रोखण्यासाठी गेलेले कर्मचारीच बेशुद्ध होऊन रुग्णालयात भरती झाले. या पार्श्‍वभूमिवर अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांशी संवाद साधला असता, विभागाजवळ प्रशिक्षित कर्मचारी आणि साहित्यच उपलब्ध नसल्याचे उजेडात आले. 
आगीत सापडलेल्या नागरिकांची त्यातून सुटका करण्यासाठी कर्मचार्‍याला आवश्यक असलेला अँसबेस सूट, गमशूज, टॉर्च, फायरमन एक्स आणि फायर हुक विभागाकडे उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे. चाळीस कर्मचार्‍यांचा ताफा असलेल्या अग्निशमन विभागाकडे फक्त पाच कर्मचारी प्रशिक्षित असल्याचेदेखील उघड झाले आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाकडून नागरिकांचा बचाव होऊ शकतो का? असा प्रश्न विभागातील कर्मचार्‍यांकडूनच उपस्थित करण्यात आला आहे.

Web Title: Fire Fighting Systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.