आग लागून कारची होळी
By Admin | Updated: March 13, 2017 00:59 IST2017-03-13T00:59:21+5:302017-03-13T00:59:21+5:30
पाचोरा : चालकासह तिघे सुखरूप बचावले

आग लागून कारची होळी
वरखेडी, ता.पाचोरा : शेंदुर्णी, ता.जामनेर येथील शंकर पंढरीनाथ इंदूरकर यांच्या मालकीच्या एमएच-26-एम 2814 या धावत्या गाडीने पाचोरा-वरखेडी रोडवर पाचो:याजवळ अचानक पेट घेतला. या वेळी गाडीमध्ये चालकासह तीन जण होते. ते लगेच बाहेर आल्याने सुखरूप आहेत.
12 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास पाचोरा येथील गॅरेजमधून नुकतेच या मारुती-800 चे तांत्रिक काम आटोपून चालक सागर नथ्थू माळी हा शेंदुर्णीला जात असताना पाठीमागून येणा:या मोटारसायकलस्वारांनी चालक माळी यास सांगितले की, गाडीने मागून पेट घेतलेला आहे.
तेव्हा चालकाने ताबडतोब गाडी थांबवून आपल्यासह गाडीत असलेल्या दोघांनाही सुखरूप उतरविल्याने अनर्थ टळला. स्पार्किगमुळे गाडीने पेट घेतला असावा, अशी माहिती चालकाने दिली. या घटनेत पाचो:याचा अग्निशमन बंब येईर्पयत बघता-बघता गाडी पूर्ण जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. (वार्ताहर)