जळगावात लॉँड्रीला लागलेल्या आगीत कपडे जळून खाक

By Admin | Updated: June 4, 2017 17:30 IST2017-06-04T17:30:31+5:302017-06-04T17:30:31+5:30

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या शेजारीच असलेल्या लॉँड्रीच्या टपरीला रविवारी पहाटे 4.30 वाजता अचानक आग लागली.

Fire burns in a fire in Laodrio in Jalgaon | जळगावात लॉँड्रीला लागलेल्या आगीत कपडे जळून खाक

जळगावात लॉँड्रीला लागलेल्या आगीत कपडे जळून खाक

>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.4 : रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या शेजारीच असलेल्या लॉँड्रीच्या टपरीला रविवारी पहाटे 4.30 वाजता अचानक आग लागली. त्यात लाँड्रीमधील कपडे व टपरी जळून खाक झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांना आगीची माहिती मिळताच त्यांनी अग्निशमन त्यांनी अगिAशमन दलाचा बंब घटनास्थळी बोलावला.त्यानंतर आग विझविण्यात आली.
रामानंदनगरातील रामानंदगनर पोलिस ठाण्याच्या शंभर मीटरच्या अंतरावर दीपक पवार हे लॉँड्रीचा व्यवसाय करतात. तेथे त्यांना एक टपरी ठेवली आहे. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे लाँड्री बंद करून पवार हे घरी निघून गेले. मात्र, रविवारी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या टपरीला अचानक आग लागली.  तेथून धूर बाहेर येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच अग्निशमन दलाला माहिती दिली. आगीची माहिती मिळताच दीपक पवार यांनी घटनास्थळ गाठले.  

Web Title: Fire burns in a fire in Laodrio in Jalgaon