जळगाव शहरातील कंजरवाड्यातील दारुचे अड्डे उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 21:28 IST2018-06-06T21:28:09+5:302018-06-06T21:28:09+5:30
एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी जाखनी नगर कंजरवाडा, सिंगापुर कंजरवाडा या भागात अचानकपणे वॉश आऊट मोहीम राबवून गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत सात महिलांना अटक करण्यात आली असून दारु निर्मितीचे एक लाख रुपयांचे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. दरम्यान, या कारवाईसाठी नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.

जळगाव शहरातील कंजरवाड्यातील दारुचे अड्डे उद्ध्वस्त
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,६ :एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी सकाळी जाखनी नगर कंजरवाडा, सिंगापुर कंजरवाडा या भागात अचानकपणे वॉश आऊट मोहीम राबवून गावठी दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहीमेत सात महिलांना अटक करण्यात आली असून दारु निर्मितीचे एक लाख रुपयांचे रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. दरम्यान, या कारवाईसाठी नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.
या मोहीमेत अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुमनबाई मानसिंग दहेकर, शोभा अनिल बागडे, नंदीनी नितीन बागडे, नंदा अण्णा तिरंगे, ज्योती सजिन बाटुंगे, लक्ष्मी प्रताप बागडे व प्रेमा गजमल कंजर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तयार झालेली गावठी दारु, दारु निर्मितीसाठी तयार केलेले रसायन व साहित्य असा एक लाखाच्यावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
एस.पींनी दिले होते आदेश
कंजरवाडा भागातील अवैध दारु विक्री व एमआयडीसीतील भुरट्या चोºया याबाबत तक्रारी झाल्यानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कुमक घेऊन वॉश आऊट मोहीम राबविण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना दिले होते. त्यानुसार सांगळे यांनी पोलीस निरीक्षक अनिरुध्द अढाव यांनी सकाळीच पथक तयार केले. उपनिरीक्षक निलेश सोळंके, सहायक फौजदार अतुल वंजारी, राजाराम पाटील, संभाजी पाटील, रामकृष्ण पाटील, दिनकर खैरनार, संजय धनगर, श्रीराम बोरसे, परीष जाधव, राजेंद्र सैंदाणे, जितेंद्र राठोड, संतोष सोनवणे, दीपक चौधरी, सतीष गर्जे, नितीन पाटील, विजय पाटील,किशोर पाटील, संदीप पाटील, ललीत गवळे, मनोज सुरवाडे, अतुल पाटील, भरत जेठवे, प्रकाश पाटील, सिध्दार्थ लटपटे, प्रविणा जाधव, वैशाली पावरा व अश्विनी चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.