वाडे येथे आग लागून घर जळून खाक

By Admin | Updated: April 16, 2017 16:29 IST2017-04-16T16:29:19+5:302017-04-16T16:29:19+5:30

वाडे येथे एका घरास अचानक आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यात 1 लाख 60 हजाराचे नुकसान झाले.

Fire broke out in the house at Wade | वाडे येथे आग लागून घर जळून खाक

वाडे येथे आग लागून घर जळून खाक

 भडगाव,दि.16- तालुक्यातील  वाडे येथे   एका घरास अचानक आग लागून संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यात 1 लाख 60 हजाराचे नुकसान झाले. 16 रोजी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.  आग लागताच नागरिक, महिलांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझवण्यास सहकार्य केले.  सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.

महादू दौलत माळी या शेतमजुरी करणा:या परिवाराचे अंगावरील कपडे वगळता या आगीत सर्व चीजवस्तू जळाल्या.   बाबूलाल धोंडू महाजन यांचे घरात  माळी हे भाडय़ाने राहात होते.  16 रोजी सकाळी 8 वा. परिवारासह ते कामानिमित्त बाहेर गेले होते.  घरातून  अचानक धूर निघाल्याने नागरिकांनी धाव घेतली.नळांना पाणी सोडल्याने महिला व पुरुषांनी बादल्यांनी आगीवर  पाणी मारले. आग विझवण्याचे प्रयत्न केले.

Web Title: Fire broke out in the house at Wade