फोमच्या दुकानास आग घातपाताचा संशय
By Admin | Updated: May 14, 2014 00:51 IST2014-05-14T00:51:47+5:302014-05-14T00:51:47+5:30
‘जयहिंद’ फोम अॅण्ड फर्निंशींग या दुकानाला सोमवारच्या मध्यरात्री अचानक आग लागून या अग्नीतांडवात दुकानातील फोम फर्निशींगचे ११ लाखाचे महागडे साहित्य भक्षस्थानी पडले.

फोमच्या दुकानास आग घातपाताचा संशय
फैजपूर : येथील पालिकेच्या स्वा.वीर सावरकर व्यापारी संकुलातील ‘जयहिंद’ फोम अॅण्ड फर्निंशींग या दुकानाला सोमवारच्या मध्यरात्री अचानक आग लागून या अग्नीतांडवात दुकानातील फोम फर्निशींगचे ११ लाखाचे महागडे साहित्य भक्षस्थानी पडले. आगीची तिव्रता प्रचंड असल्याने या दुमजली दुकानातील फर्निचर व अन्य साहित्य अक्षरश: कोळसा झाले. आगीमागे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावर छत्री चौकातील स्वा.वीर सावरकर व्यापारी संकुलात माजी नगरसेवक मेहबूब ईस्माईल पिंजारी यांचे गाळा क्र.१० मध्ये दुमजली जयहिंद फोम अॅण्ड फर्निशिंगचे दुकान आहे. या दुकानास सोमवारी १२ रोजीच्या मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. सकाळी तीन वाजेच्या दरम्यान व्यापारी संकुलामागील वस्तीमध्ये पापड बनविण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी झोपेतून उठलेल्या महिलांना व्यापारी संकुलातून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी रात्रीच पिंजारी यांना घटनेची माहिती दिली. संपूर्ण दुकानाने पेट घेतलेला होता. फैजपूर पालिका, सावदा पालिका व मधुकर कारखानाच्या अग्नीशामन बंबानी शर्तीचे प्रयत्न केले. सकाळी चार वाजता आग आटोक्यात आणली. मात्र पिंजारी यांच्या दुकानातील महागडे फोम फर्निशींगचे ११ लाखाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची तिव्रता प्रचंड असल्याने दुकानाचे शटर पूर्णपणे लाल झाले असल्याचे रात्रीच्या प्रत्यक्षदर्शनींनी सांगितले. मंगळवारी सकाळी तलाठी शेळकर यांनी पंचनामा केला. त्यात दुकानातील रेक्झीन, वेल्वेट, कारपेट, फोम, पडदे, गादीपाट व अन्य फर्निचर असे १० लाख ४८ हजार ५०० रुपयांचे साहित्य आगीत जळून खाक झाल्याचे म्हटले आहे. आगीबाबत फैजपूर पोलिसात सुद्धा नोंद करण्यात आली आहे. सकाळी फौजदार बी.ए.कदम, हेडकॉन्स्टेबल अर्जून सोनवणे, निंबा पाटील यांनी भेट देऊन पंचनामा केला. (वार्ताहर)