शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियात 'घडवला' खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, फेक न्यूज देणाऱ्याविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:02 IST

एकनाथराव खडसे यांच्या २१ आमदारांसह राष्टवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाबाबत फेसबुकवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करुन बदनामी करणा-या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्देराष्टवादी प्रवेशाची पोस्ट धनंजय मुंडे यांच्या नावाने बनावट अकाऊंट जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव  : माजी मंत्री तथा भाजपा आमदार एकनाथराव खडसे यांच्या २१ आमदारांसह राष्टवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेशाबाबत फेसबुकवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करुन बदनामी करणा-या व्यक्तीविरुध्द बुधवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाजपाचे माजी महानगराध्यक्ष तथा नाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक सिताराम लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २ एप्रिल रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते तथा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज तयार करुन त्या पेजवर मुंडे यांचा फोटो अपलोड केला व आमदार एकनाथराव खडसे यांच्या बद्दल जाणूनबुजून बदनामी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी प्रवेशाची पोस्ट प्रसिध्द केली. तसेच वैभव भरत पाटील या नावाच्या व्टीटर अकाऊंटवरुनही ही वादग्रस्त पोस्ट प्रसिध्द झाली आहे. भादवि कलम ५०० तसेच आयटी अ‍ॅक्ट ६६ सी,डी प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे वादग्रस्त पोस्ट‘नाथा’ ची राष्ट्रवादीला साथ...एकनाथ खडसे यांचा भाजपाला रामराम,२१ आमदारांसह होणार राष्ट्रवादीत दाखल...मुहूर्त ठरला..एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार जाहीर प्रवेश...!

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा