शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीतील व्हिडिओ चित्रण करणाऱ्या आमदाराच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 06:11 IST

Jalgaon News : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना खुर्चीला बांधून कार्यालयास कुलूप ठोकल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  

 जळगाव : महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना दोरीने बांधल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेले आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रण करणाऱ्या प्रवीण शिवाजी मराठे (४५,रा. चाळीसगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना खुर्चीला बांधून कार्यालयास कुलूप ठोकल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.  या गुन्ह्यात सर्वांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. दरम्यान, प्रवीण मराठे हा शनिवारी आमदार चव्हाण व सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आला होता. कोठडीत असलेल्या आमदारांशी चर्चा करीत असताना त्याने आपल्या मोबाइलमध्ये कोठडीचे व्हिडिओ चित्रण केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मराठे याला ताब्यात घेऊन मोबाइल जप्त केला. दरम्यान, पोलीस नाईक राजेंद्र यशवंत ठाकरे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण मराठे याच्याविरुद्ध शासकीय गोपनीयता अधिनियम १९२३ चे कलम ३ व ७ सह मुंबई पोलीस कायदा कलम १२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तपास करीत आहेत.  दरम्यान, मराठे याने शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी माहिती न्यायालयात पाठवण्यात आलेली आहे. संशयित मराठे याला नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :JalgaonजळगावBJPभाजपा