साठवलेला कापूस अखेर बाहेर

By Admin | Updated: December 22, 2015 00:39 IST2015-12-22T00:39:04+5:302015-12-22T00:39:04+5:30

नंदुरबार : गेल्या आठवडय़ापासून सरकीच्या भावात वाढ झाल्याने कापसाच्या भावातही तेजी आली

The finished cotton is finally out | साठवलेला कापूस अखेर बाहेर

साठवलेला कापूस अखेर बाहेर

नंदुरबार : गेल्या आठवडय़ापासून सरकीच्या भावात वाढ झाल्याने कापसाच्या भावातही तेजी आली असून, आजच्या स्थितीत बाजार समिती अंतर्गत खरेदी केल्या जाणा:या कापसाला 4600 ते 4700 रुपये प्रती क्विंटलने भाव मिळत आहे. परिणामी केव्हातरी चांगला भाव मिळेल या आशेने घरात साठवून ठेवलेला कापूस आता शेतकरी बाहेर काढू लागले आहेत.

कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत घुली-पळाशी शिवारात कापूस खरेदीस सुरुवात झाली. 12 ऑक्टोबरला या खरेदीस प्रारंभ झाला. यानंतर भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयने 16 नोव्हेंबरपासून कापूस खरेदीस सुरुवात केली. सुरुवातीला सीसीआयने 4100 रुपये प्रती क्विंटलने दर दिला. यामुळे शेतक:यांनी व्यापा:यांकडील खरेदीस पाठ दाखविली व आपला माल थेट सीसीआयला देणे पसंत केले. मात्र ही स्थिती फार दिवस टिकून राहिली नाही.

व्यापा:यांनी 4100 रुपयांपेक्षा अधिक भाव देण्यास सुरुवात केली आणि सीसीआयची कापूस खरेदी दोन हजार क्विंटलपेक्षा अधिक होऊ शकली नाही.

दरम्यान, नोव्हेंबरमध्येही व्यापा:यांनी 4150 ते 4200 रुपये भाव दिला. यानंतर त्यात गेल्या आठवडय़ात आणखी तेजी येऊन 4400 ते 4500 रुपयांर्पयत वाढ झाली. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकीच्या भावात प्रती क्विंटलमागे 300 रुपयांनी वाढ झाली आणि इकडे व्यापा:यांनी शेतक:याला वाढीव भाव देण्यास सुरुवात केली. परिणामी आजच्या स्थितीत घुली-पळाशी शिवारातील मार्केट यार्डात येणा:या कापसाला व्यापा:यांकडून 4600 ते 4700 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे दर मिळत आहे.

Web Title: The finished cotton is finally out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.