गुढेकर भूमिपुत्राला ग्रामस्थ आणि मित्रांची आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:21 IST2021-09-24T04:21:11+5:302021-09-24T04:21:11+5:30

३१ ऑगस्ट रोजी तितूर व डोंगरी नदीला सकाळी अचानक महापूर आला. या पुरात काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले, अशा ...

Financial help of villagers and friends to Gudhekar Bhumiputra | गुढेकर भूमिपुत्राला ग्रामस्थ आणि मित्रांची आर्थिक मदत

गुढेकर भूमिपुत्राला ग्रामस्थ आणि मित्रांची आर्थिक मदत

३१ ऑगस्ट रोजी तितूर व डोंगरी नदीला सकाळी अचानक महापूर आला. या पुरात काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले, अशा नैसर्गिक आपत्तीत गुढे येथील रहिवासी पण व्यवसायानिमित्त चाळीसगाव येथे स्थायिक झालेले डॉ. संजय लालचंद ठाकरे (चौधरी) यांची घाटरोडला हाॅटेल दयानंद समोरच्या शाॅपिंग काॅम्प्लेक्समध्ये समर्थ लॅब असून ही संपूर्ण लॅब तितूर व डोंगरी नदीच्या पुराच्या पाण्यात बुडाल्याने १५ ते २० लाख रुपयांचे कधीही न भरून निघणाऱ्या मोठ्या नुकसानीमुळे हे कुटुंब उद्ध्वस्त झाले. या संकटामुळे डॉ. ठाकरे खचून गेले होते.

संपूर्ण परिवाराचा चरितार्थ या लॅबवरच चालत होता. तीच उद्ध्वस्त झाली, म्हणून या दु:खदायक घटनेने सारेच जण हळहळले समाजमन, अशा संकटात आपल्या गावाच्या माणसासाठी धावून जाणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. म्हणून गुढेकर व मित्र परिवाराने ‘आपले गाव व आपला माणूस’ म्हणून धावून जात ‘एक हात मदतीचा’ देऊ या आवाहानाला हाक व प्रतिसाद देत तेही यथाशक्ती व स्वखुशीने गावातून व नोकरी,व्यवसायनिमित्त बाहेरगावी राहणारे भुमिपुत्रांनी व पूर्वी या गावात नोकरीनिमित्त राहणाऱ्या मित्र परिवाराने मदतीला धावून येत माणुसकी दाखवली आहे. आहे त्या ठिकाणांहून ऑनलाइन आर्थिक मदत केली.

मदतनिधी संकलन करण्यासाठी पत्रकार रवींद्र पाटील, राहुल महाजन, भाऊसाहेब कोष्टी व श्याम देसले यांनी संकलन केले. डॉ. संजय ठाकरे व डॉ. धनंजय ठाकरे हे दोन्ही बंधू नेहमीच गाववासीयांना व गरजूंना मदत करतात. त्यांच्यावरच ही आपत्ती आल्याने सर्वांनाच मोठे दुःख झाले होते. मदतनिधी म्हणून गावातून व बाहेर गावी राहणाऱ्या मित्र परिवाराने दि. १९ रोजी जमा झालेली एक लाख पाच हजार मदत निधी समर्थ लॅबवर जाऊन गाववासीयांची मायेची छोटी मदत डॉ. संजय ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून सुपुर्द करण्यात आली. यावेळी डॉ. प्रवीण भोकरे, डॉ. राहुल डहाळे, रवींद्र पाटील, राहुल चौधरी, आनंदा महाजन, सुदाम पाटील, भाऊसाहेब कोष्टी, संजय महाजन, डॉ. धंनजय ठाकरे, मयूर चौधरी आदी उपस्थित होते.

230921\img_20210919_133445.jpg

आपल्या पूरग्रस्त मित्राला आर्थिक मदत देतांना मित्रपरीवार

Web Title: Financial help of villagers and friends to Gudhekar Bhumiputra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.