अखेर भडगाव शहरातील नाला सफाईचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:54+5:302021-06-22T04:11:54+5:30

पावसाळा सुरू झाला आहे. शहरातून जाणाऱ्या कोल्हे नाल्यात काटेरी झाडेझुडपे, गवत वाढले आहे. नाल्यात गाळ साचला आहे. पावसाळ्यापूर्वी ...

Finally, the work of cleaning the nala in Bhadgaon city started | अखेर भडगाव शहरातील नाला सफाईचे काम सुरू

अखेर भडगाव शहरातील नाला सफाईचे काम सुरू

पावसाळा सुरू झाला आहे. शहरातून जाणाऱ्या कोल्हे नाल्यात काटेरी झाडेझुडपे, गवत वाढले आहे. नाल्यात गाळ साचला आहे. पावसाळ्यापूर्वी कोल्हे नाला स्वच्छतेची आवश्यकता आहे. तरी नगर परिषद प्रशासनाने तत्काळ या नाल्यातील झाडेझुडपे तत्काळ तोडून जेसीबी मशीनने स्वच्छता करावी, अशी मागणी करणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. नगर परिषद प्रशासनाने तत्काळ दखल घेत कोल्हे नाल्यासह इतर मोठ्या गटारींच्या साफसफाईचे काम सुरू झाले आहे. या कामास यापूर्वी काही भागात सुरुवात झाली होती, अशी माहिती मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

शहरातून जाणारा कोल्हे नाला ग्रीनपार्क काॅलनी भाग, आदर्श कन्याशाळा भाग, न्यायालयाच्या इमारतीमागून मेनरोड बाजारपेठ भागातून स्मशानभूमी, गिरणा नदीकडे जातो. या नाल्यात शहरातील गटारींचेही पाणी वाहते. या नाल्याचे पाणी गिरणा नदीत जाते. दरवर्षी नगर परिषदेमार्फत हा नाला जेसीबी मशीनने झाडेझुडपे तोडून, साचलेला गाळ काढून स्वच्छ करण्यात येतो. त्यामुळे पावसाळयात रोगराई न होता पावसाचे पाणी वाहण्यास सोयीचे ठरते. घाण न साचल्याने नाल्यातील पाणी सरळ वाहून जाते. त्यामुळे तत्काळ कोल्हे नाल्यातील काटेरी झाडे झुडपे तोडून जेसीबी मशीनने गाळ काढून नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते.

नगर परिषद प्रशासनाने या वृत्ताची तत्काळ दखल घेतली व कोल्हे नाला सफाईचे काम व शिवनेरी गेटसह काही भागात ड्रेनेजची स्वच्छता करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कोल्हे नाल्यासह शहरातील गटारी, मोठ्या ड्रेनेजच्या साफसफाईची कामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

===Photopath===

210621\21jal_2_21062021_12.jpg

===Caption===

भडगाव शहरातील कोल्हे नाल्याची जेसीबी मशिनच्या सहाय्याने साफसफाई करण्यात येत आहे.

Web Title: Finally, the work of cleaning the nala in Bhadgaon city started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.