गॅस वितरकांचे अखेर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:12 IST2021-06-19T04:12:07+5:302021-06-19T04:12:07+5:30
जळगाव : घरोघरी वापरात येणाऱ्या एलपीजी गॅस वितरणाशी संबंधित ३०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. गॅस डिलिव्हरी बॉय लसीकरणापासून वंचित ...

गॅस वितरकांचे अखेर लसीकरण
जळगाव : घरोघरी वापरात येणाऱ्या एलपीजी गॅस वितरणाशी संबंधित ३०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. गॅस डिलिव्हरी बॉय लसीकरणापासून वंचित राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लस दिल्याने गॅस ग्राहकांचीही सुरक्षितता जपली जाणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यापासून बचाव होण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण बंद झाल्याने अनेक जणांना लस घेता येत नाही. यात घरोघरी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅस सिलिंडर वितरणासाठी येणाऱ्या डिलिव्हरी बॉय यांनाही सर्वांच्या सुरक्षिततेसाठी लस मिळणे आवश्यक असल्याने त्या विषयी कर्मचाऱ्यांकडूनही मागणी होत होती.
डिलिव्हरी बॉयला लस मिळत नाही यासह अनेकांना संसर्गदेखील झाल्याने वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर आता ३०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचेही टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.