शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर होमिओपॅथी महाविद्यालयात महिला समितीचा लावला फलक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 16:40 IST

महिला व बाल विकास विभागाकडून तपासणी

जळगाव : शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयात तपासणीसाठी गेलेल्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाला महिला तक्रार निवारण समितीचा फलक न दिसल्याने त्यांनी तातडीने आदेशाचे पालक करा म्हणून निर्देश दिले. त्यानुसार या महाविद्यालयातील स्थापन असलेल्या समितीचा फलक तातडीने प्रदर्शनी भागात लावण्यात आल्याने तिथल्या महिला कर्मचारी व विद्यार्थिंनीना दिलासा मिळाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक आस्थापनांसह महाविद्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. तसेच समिती स्थापन केल्यावर त्याची माहिती देणारा फलक प्रदर्शनी भागात लावण्याचेही निर्देश दिले आहेत. तशातच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनीता सोनगत यांनी सर्वच आस्थापनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार संरक्षक अधिकारी भरत राणे, परिविक्षाधीन अधिकारी महेंद्र पाटील यांनी शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाला भेट दिली. या महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीचा फलक दिसून आला नाही. त्यानुसार विचारणा केल्यावर समितीची स्थापना झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र फलक लावला गेला नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा तातडीने फलक लावण्याच्या सूचना केल्यानंतर त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे.

‘बालविवाह’ कायद्याचा फलक सक्तीचामंगल कार्यालयात व धार्मीक स्थळी मुला-मुलींचे विवाह होत असतांना मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पूर्ण झाले असल्याची पडताळणी शालेय कागदपत्र पाहूनच करावी. शिवाय मंगल कार्यालयाच्या धार्मिकस्थळांच्या दर्शनी ‘बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६’व ‘हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ चे  माहिती फलक,मॅटेलीक बोर्ड, वॉल पेंटींग हे कायम स्वरुपी दर्शनी भागावर लावणे जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार बंधनकारक झाले आहे. असे घडत नसल्यास संबंधित पोलीस स्टेशन, महिला हेल्पलाईन क्रमांक १०९१ व १८१ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव