अखेर धावडे शिवारातील त्या वाळूसाठ्याचा लिलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:11 IST2021-06-22T04:11:46+5:302021-06-22T04:11:46+5:30
नांदेड (ता. धरणगाव) : अमळनेर तालुक्यातील सावखेडा तलाठी सज्जेअंर्तगत धावडे शिवारातील एका शेतात करून ठेवण्यात आलेला वाळूचा साठा ...

अखेर धावडे शिवारातील त्या वाळूसाठ्याचा लिलाव
नांदेड (ता. धरणगाव) : अमळनेर तालुक्यातील सावखेडा तलाठी सज्जेअंर्तगत धावडे शिवारातील एका शेतात करून ठेवण्यात आलेला वाळूचा साठा शासनाने पंचनामा करून ताब्यात घेतला होता. अखेर आज २१ रोजी दुपारी साठ्यावरील शिल्लक असलेल्या वाळूचा महसूल विभागाकडून लिलाव करण्यात आला.
गेल्या कित्येक दिवसांपासून या वाळूच्या साठ्यावरून रात्री-अपरात्री वाळूची चोरटी वाहतूक सुरू होती. याबाबत ‘लोकमत’मधून वेळोवेळी सचित्र सविस्तर बातम्या झळकल्यानंतर महसूल विभागाने दखल घेऊन साठ्यावर शिल्लक असलेल्या तीस ब्रास वाळूचा पंचनामा करून शिल्लक वाळूसाठा ताब्यात घेऊन रात्रीच्या वेळी तलाठी व कोतवाल यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. तसेच २१ रोजी ‘लोकमत’मधून ‘धावडे शिवारातील वाळूसाठा शासनाने घेतला ताब्यात; लवकरच लिलाव होणार’ अशा मथळ्याखाली सचित्र सविस्तर वृत्त झळकल्यानंतर त्याच दिवशी दुपारी मंडळ अधिकारी गवळी, तलाठी सतीश शिंदे यांनी ३० ब्रास वाळूसाठ्याचा ३९५० रुपये प्रतिब्रासप्रमाणे लिलाव करण्यात आला.
[धावडे शिवारातील त्या वाळूसाठ्याचा लिलाव करताना मंडळ अधिकारी गवळी, तलाठी सतीश शिंदे व नागरिक. छाया -राजेंद्र रडे, नांदेड] २२सीडीजे ४