शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम वर्षाच्या परीक्षा तूर्त पुढे ढकलल्या ; लवकरच जाहीर होईल नवीन वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 20:11 IST

जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लेखनी बंद आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून कवयित्री ...

जळगाव : विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या लेखनी बंद आंदोलनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या १ आक्टोंबर पासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्ष / अंतिम सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या तातडीने झालेल्या बैठकीत मंगळवारी सायंकाळी एकमताने घेण्यात आला.कुलगुरू प्रा. पी पी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाची आॕनलाईन बैठक झाली. या बैठकीत मंडळाच्या सर्व सदस्यांचे मत जाणून घेण्यात आले.*कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय परीक्षा घेणे शक्य नाही*२४ सप्टेंबर पासून राज्यातील अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी लेखनी, अवजार बंदसह ठिय्या आंदोलन पुकारले आहे. तसेच १ आॕक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या सहा दिवसांपासून परीक्षांबाबतची सर्व कामे ठप्प झाली आहेत. या परिस्थितीत आॕफलाईन व आॕनलाईन परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या परीक्षा तुर्त पुढे ढकलाव्यात अशी सर्व सदस्यांनी एकमताने भावना व्यक्त केली. कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय या परीक्षा घेणे शक्य नाही असेही मत सदस्यांकडून मांडण्यात आले.*सदस्यांचे मत जाणून घेऊन, परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय*अखेर कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांनी सर्व सदस्यांचे मत जाणून या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले व परीक्षेच्या पुढील तारखा व नवीन वेळापत्रक आंदोलनाची परिस्थिती पाहून जाहीर केले जाईल असे सांगितले असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली. या बैठकीत प्र- कुलगुरू , सर्व अधिष्ठाते, सहयोगी अधिष्ठाते व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव