आयटीआयची अंतिम फेरी ८ जानेवारीपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST2021-01-10T04:12:51+5:302021-01-10T04:12:51+5:30

जळगाव : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ८ जानेवारीपासून अंतिम फेरी सुरू होणार आहे. पहिल्या फेरीत ज्यांना प्रवेश ...

Final round of ITI from January 8 | आयटीआयची अंतिम फेरी ८ जानेवारीपासून

आयटीआयची अंतिम फेरी ८ जानेवारीपासून

जळगाव : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये ८ जानेवारीपासून अंतिम फेरी सुरू होणार आहे. पहिल्या फेरीत ज्यांना प्रवेश मिळु शकलेला नाही. त्यांना अंतिम फेरीतून प्रवेश घेण्याची संधी आहे. त्यात ८ जानेवारी सायंकाळी ५ वाजेपासून ११ जानेवारी पाच वाजेपर्यंत* नव्याने ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे, आधीच्या अर्जात काही चुका झाल्या असल्यास त्यात बदल करता येणार आहे. १३ ते १६ जानेवारी दरम्यान इच्छुक असलेल्या आयटीआयला प्रत्यक्ष भेट देऊन सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत* समपुदेशन फेरी होणार आहे. संबधीत संस्थेत प्रवेश शुल्क (फी) आणि मुळ कागदपत्रांसहीत उपस्थीत रहावे, अधिक माहितीसाछी जवळच्या आयटीआयला भेट देण्याचे तसेच शक्य असल्यास संस्थेतील प्रवेश विभागातील योग्य व्यक्तीची भेट घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Final round of ITI from January 8