शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

भर वस्तीत डीपीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 01:33 IST

आॅईल गळतीने आग? : अनेक ठिकाणचा वीजपुरवठा करावा लागला खंडित

भुसावळ, जि.जळगाव : येथील न्यायालयामागील विद्युत डीपीच्या खालील बॉक्स व कटआऊटला भीषण आग लागली. रविवारी सायंकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. आग इतकी भयानक होती की, या आगीत डीपीतून बॉक्समध्ये जाणाऱ्या केबलसह बॉक्स व थ्री फेस कटआऊट पूर्णपणे जळूत खाक झाले.ऐन सणासदीचा दिवस व सायंकाळची वेळ असल्याने तेथील रस्ता नेहमी गजबजलेला असतो. आग ऐवढी भीषण होती की, तिचे गोळेचे गोळे खाली पडत होते.डीपीतील आॅईलने आणखी जास्त आग भडकली असती व त्या डीपीपासून अगदी काहीच अंतरावर जवळच दोन नंबरचा पेट्रोलपंप होता. त्यालाही धोका होता. याशिवाय न्यायालयाच्या इमारतीलाही आग लागून महत्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले असते. समोरच दवाखानादेखील होता. या आगीमुळे शांतीनगर, सहकारनगर, भोळे कॉलनी, कोटेचा कॉलेज परिसर, कोर्ट फीडर, तहसील कार्यालय, कुळकर्णी प्लॉट, मेथाजी मळा, वसंत टॉकीज परीसर, गवळी वाडा, म्युनिसिपल पार्क या भागातील वीजपुरवठा एक ते दिड तास खंडित करण्यात आला.सायंकाळ असल्याने अंधारामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना त्रास झाला. बॅटरीच्या व मोबाइलच्या उजेडात कर्मचाºयांनी ११ ठिकाणचा वीजपुरवठा बंद केला. नगरपालिकेच्या अग्निशमनच्या एका बंबाद्वारे आग आटोक्यात आणली.आग लागल्याची माहिती म्युनिसिपल पार्कमधील कैलास साळी या युवकाने कळवली. वीज वितरण कंपनीचे दिनेश फेगडे, लीलाधर कोळी, समाधान कोतवाल, प्रमोद धनके, रवींद्र सोनवणे, भूषण पाटील, विजय चौधरी यांनी धाव घेतली. आग लागल्याने ट्रान्सफॉर्मरच्या खाली असलेल्या बॉक्स व कटआऊट व केबलचे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले. या डीपीवरुन वकील गल्ली, निंभोरकर वाडासह १५० घरांचा विद्युतपुरवठा बंद झाला असून, सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दिनेश फेगडे यांनी सांगितले.सणांमध्ये १५० कुटुंबांना पूर्ण रात्र अंधारात काढावी लागणार असल्याने तेथील रहिवाशी संतप्त झाले. आगीचे कारण समजू शकले नाही, पण ट्रान्सफॉर्मरमधील आॅईल लीक झाल्याने आग लागल्याची चर्चा आहे.

टॅग्स :fireआगBhusawalभुसावळ