बोरीच्या वाया जाणाऱ्या पाण्यातून कंकराज धरण भरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:20 IST2021-08-24T04:20:51+5:302021-08-24T04:20:51+5:30
पारोळा : तामसवाडी ता. पारोळा येथील बोरी ९० टक्क्यांच्या वर भरले आहे. केव्हाही ते १०० टक्के भरू शकते. मग ...

बोरीच्या वाया जाणाऱ्या पाण्यातून कंकराज धरण भरावे
पारोळा : तामसवाडी ता. पारोळा येथील बोरी ९० टक्क्यांच्या वर भरले आहे. केव्हाही ते १०० टक्के भरू शकते. मग बोरी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागेल. हे पाणी नदीद्वारे वाया न जाऊ देता त्या विसर्ग होणाऱ्या पाण्यातून कंकराज धरणाचे पुनर्भरण करण्याची मागणी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
बोरी धरणातून वाया जाणारे पाणी पाटचारीतून उजव्या कालव्याद्वारे कंकराज धरणात सोडण्यात यावे. एक दोन दिवसात या पाटचारीची दुरुस्ती करून प्राधान्यक्रमाने हे काम करून ते वाया जाणाऱ्या पाण्यातून हे कंकराज धरण भरून घ्यावे अशी मागणी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केली आहे.