शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
3
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
4
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
5
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
6
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
7
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
8
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
9
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
10
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
11
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
12
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
13
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
14
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
15
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
16
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
17
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
18
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
19
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
20
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल

पंतप्रधानांचे चित्रीकरण अन् एस.पींच्या बदलीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या आठवड्यात धुळे दौरा झाला. धुळ्याला जाण्याआधी मोदी विमानाने जळगावला आले. त्यांच्या आगमनाच्यावेळी काही जणांनी चोरुन व्हिडीओ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पंतप्रधानांची कडेकोट सुरक्षा पाहता हा व्हिडीओ झालाच कसा?, ज्यांनी व्हिडीओ तयार केला त्यांना विमानतळात प्रवेश कसा मिळाला?, त्यांच्याजवळ पास होता का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित राहत असताना सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचा ठपका पोलीस दलावर ठेवून हे प्रकरण पोलीस अधीक्षकांच्या अंगाशी आल्याची चर्चा सुरु झाली.

ठळक मुद्देविश्लेषणविशिष्ट लोकांनाच शिंदे यांच्या बदलीची चिंतापोलीस अधीक्षक व जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्यातही खटके

सुनील पाटीलजळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या आठवड्यात धुळे दौरा झाला. धुळ्याला जाण्याआधी मोदी विमानाने जळगावला आले. त्यांच्या आगमनाच्यावेळी काही जणांनी चोरुन व्हिडीओ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. पंतप्रधानांची कडेकोट सुरक्षा पाहता हा व्हिडीओ झालाच कसा?, ज्यांनी व्हिडीओ तयार केला त्यांना विमानतळात प्रवेश कसा मिळाला?, त्यांच्याजवळ पास होता का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित राहत असताना सुरक्षेचे धिंडवडे निघाल्याचा ठपका पोलीस दलावर ठेवून हे प्रकरण पोलीस अधीक्षकांच्या अंगाशी आल्याची चर्चा सुरु झाली. पुढे जावून ही चर्चा थेट पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीपर्यंत येवून ठेपली. दरम्यान, विमानतळावर पासेसच्या कारणावरुन पोलीस अधीक्षक व जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्यातही खटके उडाल्याचे सांगितले जात आहे. खरे तर अंतर्गत सुरक्षा ही राष्टÑीय सुरक्षा एजन्सीची जबाबदारी होती तर प्रवेशद्वाराजवळून आतमध्ये कोणाला सोडायचे व सोडू नये याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची होती. पंतप्रधानांच्या आगमनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आयबी या गुप्तचर यंत्रणेने दिल्ली मुख्यालयात अहवाल पाठविला असून त्यात पोलीस यंत्रणेवरच ठपका ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे यात तथ्य असेल तर पोलीस अधीक्षकांची बदली होऊ शकते. नाही तर पोलीस अधीक्षक हजर झाल्यापासून दोन महिन्यात त्यांच्या बदलीची चर्चा रंगायला लागली.  शिंदे हे दोन दिवस रजेवर किंवा मुंबई बैठकीला गेले तरी त्यांच्या बदलीची चर्चा होते. या चर्चेची आता त्यांनाही सवय झालेली आहे. बदलीची चर्चा करणारा हा विशिष्ट गट आहे. हाच गट बदलीची अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. खरे तर शिंदे यांची जिल्ह्यातील कामगिरी सर्वसामान्य जनतेसाठी नक्कीच कौतुकास्पद आहे. विशिष्ट लोकांनाच शिंदे यांच्या बदलीची चिंता लागली आहे. पोलीस दलातील ८० टक्के अधिकारी, कर्मचारी व सामान्य जनता यांना तर शिंदेची कामगिरी सरसच वाटत आहे. अवैध धंदे बंद झाल्याने गरीब व मजुरी करणाºया कुटुंबाच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. याच्याशिवाय दुसरा आनंद काय असू शकतो. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव