धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल
By Admin | Updated: June 10, 2014 14:32 IST2014-06-10T14:28:07+5:302014-06-10T14:32:35+5:30
ईस्लामी धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिना या धार्मिक स्थळाबाबत धार्मिक भावना दुखावणारा संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल
जळगाव : ईस्लामी धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिना या धार्मिक स्थळाबाबत धार्मिक भावना दुखावणारा संदेश शनिपेठेतील मलिक अपार्टमेंटमध्ये रहाणार्या शेख असिफ शेख, वय ३२ या युवकाच्या मोबाइलवरील व्हाटस् अँपवर पाठविल्याप्रकरणी कांचननगरातील आरोपी अक्षय गोपाल पाटील (१८) याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील फुले मार्केटमध्ये गेट क्रमांक २ जवळ आरोपी अक्षय पाटील याने त्याच्या ९९२२९११३८२ क्रमांकाच्या मोबाइलवरून शेख असीफ शेख याच्या ९८८१६९९0८६ क्रमांकाच्या मोबाइलवर मार्केट ग्रुपमध्ये इस्लाम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मदिनाचे धार्मिक भावना दुखावणारे चित्र व्हॉटस् अँपद्वारे पाठविले.
याप्रकरणी शेख आसीफ शेख शरीफ यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
इस्लाम धर्मात सर्वात पवित्र मानल्या जाणार्या मक्का शरीफवर खोडसाळपणे चित्र बनवून फिर्यादी व मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्यामुळे आरोपी अक्षय पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आक्षेपार्ह संदेशामुळे शनिपेठेत तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी शहर पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.