तीन बँकांच्या पाच तत्कालीन व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:21 IST2021-09-04T04:21:59+5:302021-09-04T04:21:59+5:30
रावेर, जि. जळगाव : तालुक्यातील ३७ शेतकरी संरक्षित विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. यात शेतकऱ्यांच्या नुकसानीस ...

तीन बँकांच्या पाच तत्कालीन व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल
रावेर, जि. जळगाव : तालुक्यातील ३७ शेतकरी संरक्षित विम्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. यात शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार धरून रावेर येथील तीन बँकांच्या तत्कालीन पाच शाखा व्यवस्थापकांविरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेंट्रल बँकेचे खानापूर येथील तत्कालीन शाखा व्यवस्थापक पंकज सारंगधर केदारे व नितीन यशवंत शेंडे, आयसीआयसीआय बँकेचे रावेर येथील शाखा व्यवस्थापक ऋषीकेश शिवाजी गव्हाणकर, बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण यशवंत बोरोले व सचिन सुभाष बाविस्कर अशा पाच जणांचा गुन्ह्य दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
सन २०१९ - २० मध्ये केळी फळपीक विमा योजनेचा विमा हप्ता कपात करण्यात आला. या शेतकऱ्यांची माहिती व विहीत वेळेत इंडियन ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या पोर्टलवर भरली नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी संरक्षित विम्याच्या लाभापासून वंचित राहिले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तालूका कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी शुक्रवारी फिर्याद दिली. त्यावरुन वरील तीनही बँकांच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकांविरुध्द रावेर पोलिसात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सावदा येथील बडोदा बॅंक शाखा व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.