भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:19 IST2021-08-26T04:19:19+5:302021-08-26T04:19:19+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक, महाड, जळगाव व धुळे या ठिकाणी ...

भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्धही गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक, महाड, जळगाव व धुळे या ठिकाणी गुन्हे दाखल होऊन राणे यांना अटक करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ जिल्हा भाजपतर्फे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेश असताना, विनापरवानगी बेकायदेशीररीत्या घोषणाजी करत रॅली काढली, तसेच विविध प्रकाराची घोषणाबाजी करत आंदोलन केले. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अंमलदार नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून आंदोलनात सहभागी भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा दीप्ती चिरमाडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, नगरसेविका दीपमाला काळे, नगरसेविका रंजना घोरपडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, कार्यालयीन मंत्री प्रकाश पंडित, मंडळ अध्यक्ष विजय वानखेडे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात मुंबई पोलीस अधिनियम ३७ (१)(३)चे उल्लंघन व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार उल्हास चर्हाटे हे करीत आहेत.