ग्रामपंचायत दप्तर गहाळप्रकरणी गुन्हा दाखल करा, अन्यथा आत्मदहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:16 IST2021-07-26T04:16:47+5:302021-07-26T04:16:47+5:30
१४व्या वित्त आयोगाच्या खात्यातून कोणतेही लिखित काम नसताना, सरपंच, ग्रामसेवक यांच्या परस्पर सह्या करून, दोन लाख शहात्तर हजार ...

ग्रामपंचायत दप्तर गहाळप्रकरणी गुन्हा दाखल करा, अन्यथा आत्मदहन
१४व्या वित्त आयोगाच्या खात्यातून कोणतेही लिखित काम नसताना, सरपंच, ग्रामसेवक यांच्या परस्पर सह्या करून, दोन लाख शहात्तर हजार वेगवेगळ्या दोन चेकने काढण्यात आली होती. त्यानंतर, ग्रामविकास खात्यातील अवर सचिव विजय चांदेकर यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर, विस्तार अधिकारी यांनी चौकशी केली असता, ती रक्कम काढण्यात आली, असे बँक स्टेटमेंट व ही बाब स्वतः ग्रामसेवक यांनी पंचायत समिती धरणगाव येथील विस्तार अधिकारी यांच्यासमोर लिखित स्वरूपात मान्य केली आहे, तसेच चौकशीदरम्यान ती रक्कम खात्यात भरण्यातही आली, पण पंचायत समिती, धरणगाव येथील विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ज्या ज्या व्यक्ती या प्रकरणात दोषी आढळले आहेत, यांच्यावर कोणतीही कारवाई अथवा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे या प्रकरणात तेही तेवढेच गुन्हेगार आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांचे म्हणणे आहे.
गावातील ग्रामपंचायतीमधील दप्तरही गहाळ झाले आहे, असे मागविलेल्या माहिती अधिकारातून समोर आले आहे, तरी त्या ग्रामसेवकावर, विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई न केल्याने आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे.