प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:35+5:302021-07-21T04:13:35+5:30

घुसरडी बु. ता. पाचोरा येथील सुभाष दशरथ पाटील यांची नात म्हणजे गावात राहत असलेल्या मुलीची मुलगी हिच्याशी गावातीलच भूषण ...

Fighting over the cause of love marriage | प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून हाणामारी

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून हाणामारी

घुसरडी बु. ता. पाचोरा येथील सुभाष दशरथ पाटील यांची नात म्हणजे गावात राहत असलेल्या मुलीची मुलगी हिच्याशी गावातीलच भूषण छोटू सोनवणे याच्याशी प्रेमसंबंध होऊन भूषण याने मुलीस पळवून नेत विवाह केला. गावी आल्यावर भूषण हा आमच्या घराकडे पाहून थुंकतो. सिगारेट ओढून धूर सोडतो, गाडीचा हॉर्न जोरात वाजवतो.

यासंबंधी सुभाष पाटील घरात पत्नीशी चर्चा करीत असताना भूषण सोनवणे, त्याचे वडील छोटू निंबा सोनवणे, आई कल्पना सोनवणे हे लाठ्याकाठ्या घेऊन घरात घुसले. शिवीगाळ करीत मारहाण केल्याची फिर्याद सुभाष पाटील यांनी दाखल केली. यावरून प्रेमविवाह केलेला मुलगा भूषण सोनवणे, छोटू सोनवणे त्याची आई कल्पनाबाई सोनवणे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कल्पना सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीत मुलगा भूषण यास आव्हान देत बाहेर बोलावून डोळ्यात मिरचीपूड फेकली. यावेळी फिर्यादी कल्पना सोनवणे ही बाहेर बोलायला गेली असता समाधान सुभाष पाटील याने महिलेची साडी ओढून अंगाशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला, तर सुभाष दशरथ पाटील, मीराबाई पाटील, सुनीता पाटील, मालूबाई पाटील यांनी जबर मारहाण केली. यावरून कल्पनाबाईच्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Fighting over the cause of love marriage