ग्रा.पं.निवडणुकीच्या कारणावरून लमांजनमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:20+5:302021-02-05T05:56:20+5:30
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान सुनील पाटील हा मुंबईत नोकरीला असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावाला आला होता. रविवारी ...

ग्रा.पं.निवडणुकीच्या कारणावरून लमांजनमध्ये हाणामारी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सुरक्षा बलाचा जवान सुनील पाटील हा मुंबईत नोकरीला असून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावाला आला होता. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता गावातील योगेश भास्कर पाटील याने सुनील याला ग्रामपंचायत निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी त्याच्या टपरीवर बोलावून घेतले. तेथून घरी आल्यानंतर थोड्यावेळाने गावातील बापू परबत पाटील, गोरख निंबा पाटील, भागवत रामदास पाटील, विठ्ठल वाल्मीक पाटील, पिंटू रामलाल पाटील, आबा निंबा पाटील, भिका भगवान पाटील व योगेश भास्कर पाटील असे घरी आले व सुनील याच्या नावाने जोरजोरात आरडाओरड करू लागले व सुनील याला तू ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाग का घेतला म्हणून मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी पत्नी विद्या व आई मंगला पाटील यांनाही मारहाण करण्यात आली. त्यात मंगला पाटील यांची १० ग्रॅमची सोन्याची पोत तुटून हरविली. सुनील याला जास्त मार लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी मंगला पाटील यांच्या फिर्यादीवरून वरील आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.