चिंचोली येथे दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:37+5:302021-07-18T04:12:37+5:30
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे शुक्रवारी रात्री दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. यात घराच्या दरवाजाची तसेच वाहनाची तोडफोड करण्यात आली ...

चिंचोली येथे दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी
जळगाव : तालुक्यातील चिंचोली येथे शुक्रवारी रात्री दोन कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. यात घराच्या दरवाजाची तसेच वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटाच्या १६ जणांविरुध्द शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
कौटुंबिक कारण व नात्यातील व्यक्तीच्या मृत्यूला जबाबदार धरल्याच्या कारणावरुन हा वाद उफाळून आला.
रेखा राजेंद्र पालवे (वय ४४) यांच्या फिर्यादीवरुन मुकेश पंडीत पठार, महेंद्र पंडीत पठार, पंडीत धनू पठार, कविता पंडीत पठार, मंगलाबाई पंडीत पठार तसेच संगीता पंडीत पठार (सर्व रा. चिंचोली) या सहा जणांविरोधात तर कविता पठार यांच्या फिर्यादीवरुन रघुनाथ एकनाथ पालवे, विशाल रघुनाथ पालवे, अमोल रघुनाथ पालवे, राजू एकनाथ पालवे, सुधाकर एकनाथ पालवे, शुभम अतुल लाड, जितेंद्र दयाराम पोळ , ज्योती जितेंद्र पोळ, सीमा रघुनाथ पालवे,राजू पालवेची पत्नी अशा दहा जणांविरोधात शनिवार १७ जुलै एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, गफूर तडवी, रतिलाल पवार, सिद्धेश्वर डापकर करीत आहेत.