अंजुमन शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:55+5:302021-08-17T04:23:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : अंजुमन शिक्षण संस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला. संस्थेशी संबंध ...

अंजुमन शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत हाणामारी
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : अंजुमन शिक्षण संस्थेच्या रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला. संस्थेशी संबंध नसलेल्यांनी गर्दी जमा करून गोंधळ घातल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेत दोन गटात वाद सुरू आहे. यापूर्वीही संस्थेत दोन वेळेस वाद झाले होते. संस्थेचे उपाध्यक्ष नूर मोहम्मद पटेल यांनी सभेचा अजेंडा काढून रविवारी दुपारी सभा बोलाविली होती. सभेस काही सदस्यांची उपस्थिती होती. मात्र, बाहेरील काही जणांनी वाद उपस्थित करून गोंधळ घातल्याने वेगळे वळण लागून किरकोळ हाणामारीचा प्रकार घडला. पोलिसांनी मध्यस्थी करीत शांततेचे आवाहन केले.
तरीही शिक्षण संस्थेचा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. हाणामारीत तीन जण जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून जळगावला हलविण्यात आले. पोलीस ठाण्यात अद्याप याबाबत नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले. काही राजकीय कार्यकर्ते हस्तक्षेप करून संस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.