निवडणुकीच्या वादातून मारहाण व विनयभंग
By Admin | Updated: October 25, 2015 00:23 IST2015-10-25T00:23:21+5:302015-10-25T00:23:21+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून खर्देखुर्द, ता.नंदुरबार येथे दोन गटात वाद झाला. परस्परविरोधी फिर्यादीअंतर्गत मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या वादातून मारहाण व विनयभंग
नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून खर्देखुर्द, ता.नंदुरबार येथे दोन गटात वाद झाला. परस्परविरोधी फिर्यादीअंतर्गत मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील छगन चित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लताबाई शांतीलाल चित्ते या निवडणुकीत उभ्या आहेत. त्यांना सुनील चित्ते यांनी आपण तुम्हाला मत देणार नाही म्हणून सांगितले. त्याचा राग येऊन लताबाई चित्ते, अक्षय शांतिलाल चित्ते, शांतिलाल झांबर चित्ते, भरत झांबर चित्ते, राहुल भरत चित्ते यांनी शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी व लाठीकाठीने मारहाण केली. अक्षय चित्ते यांनी कु:हाडीने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दुस:या फिर्यादीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे म्हटले आहे. गावातील घराच्या ओटय़ावर अल्पवयीन मुलगी उभी असताना सुनील चित्ते यांनी मागून जाऊन मुलीला धरले तसेच छेडखानी करून विनयभंग केल्याचे मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सुनील छगन चित्ते याच्याविरुद्ध विनयभंगाचा व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक के.जी. पवार, फौजदार डी.एस. महिरे व जमादार सोनवणे करीत आहे. लायनेसचे संमेलन नंदुरबार : लायनेस डिस्ट्रिक्ट 323 एच दोनचे क्षेत्रीय संमेलन 25 ऑक्टोबर रोजी नंदुरबारात होत आहे. हिरा एक्ङिाकेटीव्हमध्ये दिवसभर चालणा:या या संमेलनात विविध स्पर्धादेखील घेण्यात येणार आहेत. क्षेत्र तीनचे पदाधिकारी या संमेलनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती क्षेत्रीय संयोजिका डॅा.सुनंदा पाटील, पिनल शहा, चेतना शहा यांनी दिली.