प्रक्षेत्र भेट व क्षेत्र दिन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:09+5:302021-09-08T04:21:09+5:30
या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला. एकूण २५ एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यानिमित्त प्रक्षेत्र ...

प्रक्षेत्र भेट व क्षेत्र दिन कार्यक्रम
या प्रकल्पाच्या माध्यमातून एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला. एकूण २५ एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यानिमित्त प्रक्षेत्र भेट व क्षेत्र दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थी शेतकऱ्यांना बियाणे, बीजप्रक्रियेसाठी जिवाणू खते, कीडनियंत्रणासाठी कीडनाशके तसेच पिवळे चिकट सापळे निविष्ठा म्हणून वाटप करण्यात आले. तुषार लक्ष्मण परतने यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपले मत मांडले. अध्यक्ष म्हणून विजय वासुदेव चौधरी तसेच दिनकर परतने, तसेच शास्त्रज्ञ अतुल पाटील यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे असे मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाप्रसंगी तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथील शास्त्रज्ञ प्रा. ए. शेख, डॉ. एस. एस. पाटील, डॉ. बी. डी. मालुंजकर हे उपस्थित होते. तसेच लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन युवराज कोळी यांनी केले.