वटार येथील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
By Admin | Updated: May 4, 2017 13:59 IST2017-05-04T13:59:25+5:302017-05-04T13:59:36+5:30
तालुक्यातील वटार येथील जगन साहेबराव पाटील (६८) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.

वटार येथील शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू
ऑनलाइन लोकमत
चोपडा, दि. 04 - तालुक्यातील वटार येथील जगन साहेबराव पाटील (६८) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला.
जगन पाटील २ रोजी आपल्या शेतात दिवसभर पाणी भरण्याचे काम करुन ते घरी आले रात्री ताप, डोके दुखणे व मळमळ होत असल्याने ऊन लागले म्हणून रात्री घरगुती उपचार केले. ३ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांना चोपडा येथील डॉ.स्नेहल भामरे यांच्या खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यांनी प्राथमिक तपासणी करीत उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. जगन पाटील यांना उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.जगन पाटील यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याच्या वृत्ताला डॉ. स्रेहल भामरे यांनी दुजोरा दिला आहे.
जगन पाटील यांचा एकुलता एक कर्ता मुलगा सुमारे आठ वर्षांपूर्वी मयत झाला आहे.